India vs Australia :भारत दौऱ्यासाठी कांगारू सज्ज; दोन प्रमुख खेळाडूंना डावलून 'विराट'सेनेचा सामना करणार 

ऑस्ट्रेलियाचा संघ या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 11:47 AM2019-02-07T11:47:28+5:302019-02-07T11:47:44+5:30

whatsapp join usJoin us
Australia tour of India 2019: Mitchell Starc ruled out due to muscle injury | India vs Australia :भारत दौऱ्यासाठी कांगारू सज्ज; दोन प्रमुख खेळाडूंना डावलून 'विराट'सेनेचा सामना करणार 

India vs Australia :भारत दौऱ्यासाठी कांगारू सज्ज; दोन प्रमुख खेळाडूंना डावलून 'विराट'सेनेचा सामना करणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : श्रीलंका संघाला कसोटी मालिकेत पराभवाचे पाणी पाजून विजयपथावर पोहोचलेला ऑस्ट्रेलियाचा संघ या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात 2 ट्वेंटी-20 आणि 5 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने गुरुवारी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. मात्र या संघात जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू मिचेल मार्श यांचा समावेश करण्यात आलेला नाही. 

स्टार्कला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखा झाली होती आणि त्यामुळे त्याला भारत दौऱ्याला मुकावे लागले आहे. मार्शला मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आल्याचा भूर्दंड भरावा लागला. याशिवाय भारताविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या आणखी एका खेळाडूला वगळण्यात आले आहे. मार्शसह पीटर सिडल व बिली स्टॅनलेक यांचा 15 सदस्यांत समावेश नाही. 

बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या केन रिचर्डसनचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यासह नॅथन कोल्टर नील आणि अॅश्टन टर्नर यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा डी'अॅर्सी शॉर्टनेही संघात स्थान पटकावले आहे. शॉन मार्शचा संघात समावेश आहे, परंतु तो पहिल्या दोन वन डेत खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला अॅलेक्स करीसह संयुक्त उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ट्वेंटी-20 सामन्यांनी सुरु होईल. 24 व 27 फेब्रुवालीला अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे हे सामने होतील. त्यानंतर 2 मार्चला हैदराबाद येथे पहिला वन डे सामना होईल. त्यापाठोपाठ नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च) व दिल्ली ( 13 मार्च) येथे सामने होतील. 


ऑस्ट्रेलियाचा संघ : अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), पॅट कमिन्स, अॅलेक्स करी, जेसन बेहरेंडोर्फ, नॅथन कोल्टर नील, पीटर हँड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, डी'अ‍ॅर्सी शॉर्ट.  

Web Title: Australia tour of India 2019: Mitchell Starc ruled out due to muscle injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.