ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ (ICC T20 World Cup 2021) पहिली उपांत्य फेरी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी अबूधाबीच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लढत होईल, तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी ११ नोव्हेंबर रोजी दुबईच्या स्टेडियमवर होणार असून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पाकिस्ताननं ग्रुप २ मधील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आणि आता ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. Semi Finalमध्ये पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांना मोठी ऑफर दिली आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही ( PCB) याबाबत माहिती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाच्या या ऑफरवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं प्रतिक्रिया दिली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली आहे. २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. पीसीबीनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १९९८नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन संघ पाक दौऱ्यावर येतोय. मार्च २०२२मध्ये होणाऱ्या या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वन डे व १ ट्वेंटी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिका ही आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भाग असेल, तर वन डे मालिका ही आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगमधील मालिका असेल. १३ देशांचा सहभाग असलेल्या या सुपर लीगमधून टॉप ७ संघ २०२३ वन डे वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा
- पहिली कसोटी - ३-७ मार्च , कराची
- दुसरी कसोटी - १२- १६ मार्च, रावळपिंडी
- तिसरी कसोटी - २१- २५ मार्च, लाहोर
- पहिली वन डे - २९ मार्च, लाहोर
- दुसरी वन डे - ३१ मार्च, लाहोर
- तिसरी वन डे - २ एप्रिल, लाहोर
- एकमेव ट्वेंटी-२० सामना - ५ एप्रिल, लाहोर
शोएब अख्तरचं ट्विटही बातमी वाचल्यानंतर सेमीफायनलमध्ये दया, माया केली जाईल?; नाही...