IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी

नाणेफेक जिंकून टीम इंडियाने घेतला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 08:02 AM2024-11-22T08:02:29+5:302024-11-22T08:05:01+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs India 1st Test Jasprit Bumrah has won the toss elected to bat Nitish Kumar Reddy And Harshit Rana make their Test debuts | IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी

IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia vs India, 1st Test : पर्थच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीसह हर्षित राणा याला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. किंग कोहलीनं नितीश रेड्डीला डेब्यू कॅप दिली. दुसरीकडे आर अश्विनकडून हर्षित राणाला कॅप देण्यात आली.

भारतीय संघाची  प्लेइंग इलेव्हन :

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेट किपर बॅटर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.

जड्डू-अश्विनपेक्षा अष्टपैलू वॉशिंग्टनवर भरवसा

पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाने अनुभवी आर अश्विन आणि जड्डूला मागे ठेवत वॉशिंग्टन सुंदरवर विश्वास दाखवला आहे.  रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलवर भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आलीये. याशिवाय शुबमन गिलच्या दुखापतीमुळे देवदत्त पडिक्कलचीही टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. तो या संधीच सोन करून दाखवणार  का? ते पाहण्याजोगे असेल. 

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन :

उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेट किपर बॅटर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.

टॉस जिंकल्यावर आता मॅच जिंकण्याचं चॅलेंज

जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा  निर्णय घेतल्यावर भारतीय संघ पहिल्या डावात किती धावसंख्या उभारणार ते पाहण्याजोगे असेल. ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय फलंदाजांसाठी मोठी कसोटी असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिके टीम इंडियासाठी खूपच महत्त्वपूर्ण झाली आहे. घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवातील उणीवा भरून काढून टीम इंडिया झोकात कमबॅक करेल का? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील.  

Web Title: Australia vs India 1st Test Jasprit Bumrah has won the toss elected to bat Nitish Kumar Reddy And Harshit Rana make their Test debuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.