AUS vs IND, 3rd Test Mitchell Starc dismissed Yashasvi Jaiswal KL Rahul ब्रिस्बेन गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव ४४५ धावांत आटोपल्यावर भारतीय संघाने बॅटिंगला सुरुवात केली. पहिल्या दोन सामन्याप्रमाणेच यावेळीही यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पण पहिल्या डावातील पहिल्याच षटकात स्टार्कनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारणाऱ्या यशस्वी जैस्वाल याला मिचेल स्टार्कनं दुसऱ्याच चेंडूवर ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
मिचेल स्टार्क एवढ्यावरच थांबला नाही. तर आपल्या दुसऱ्या षटकात त्याने यशस्वीची जागा घेण्यासाठी आलेल्या शुबमन गिललाही माघारी धाडले. गिल अवघ्या एका धावेवर तंबूत परतला.