AUS vs IND, 3rd Test, Mohammed Siraj vs Marnus Labuschagne Brisbane Bails Change Battle : ब्रिस्बेन गाबा कसोटी (IND vs AUS 3rd Test) सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात मोहम्मद सिराज विरुद्ध मार्नस लाबुशेनं यांच्यातील बेल्स अदला बदलीचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले. मैदानात या दोघांच्यामध्ये जो खेळ रंगला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
मियाँ मॅजिक अन् पुढच्या ओव्हरमध्ये आउट झाला लाबुशेनसिराजनं जे केलं ते मियाँ मॅजिकमुळे लाबुशेन चांगलाच कावरा बावरा झाला. त्याने पुन्हा बेल्सची अदला बदली केली. पण या खेळामुळे त्याची एकाग्रता कुठं तरी ढळली. ज्याची किंमत त्याला आपल्या विकेट्सच्या रुपात मोजावी लागली. बेल्स अदला बदलीच्या रंगलेल्या खेळानंतर पुढच्याच षटकात मार्नस लाबुशेन याने आपली विकेट गमावली. नितीश रेड्डीनं त्याला बाद केले. विराट कोहलीनं त्याचा अप्रतिम झेल टिपला. पिंक बॉल टेस्टमध्ये अर्धशतकी खेळीसह त्याने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले होते. पण यावेळी तो ५५ चेंडूत फक्त १२ धावांची भर घालून माघारी फिरला.