Join us

नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ 

नितीशकुमार रेड्डीचा अप्रतिम थ्रो, पंतनं चपळाई दाखवत स्टार्कचा खेळ केला खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:59 IST

Open in App

ishabh Pant Run Out Mitchell Starc On Nitish Reddy Throw :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात बॅटिंगमध्ये धमाका करणाऱ्या नितीश कुमारनं फिल्डिंगमध्ये आपला जलवा दाखवून दिला. रिषभ पंतसोबत कमालीच्या ताळमेळासह त्याने संघाला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलल्याचा सीन चौथ्या दिवसाच्या खेळात पाहायला मिळाला. मिचेल स्टार्कच्या रुपात ऑस्ट्रेलिया संघानं आपली आठवी विकेट गमावली. विकेट किपर रिषभ पंतनं त्याला  रन आउट केले. 

स्टार्क स्वस्तात फिरला माघारी

एका बाजूला पॅट कमिन्स सेट झाला होता. दुसऱ्या बाजूला स्टार्क त्याची साथ देण्यासाठी आला. मैदानात तग धरून तळाच्या फलंदाजीतील ताकद दाखवून देण्यात तो माहिर आहे. पण दुसऱ्या डावात त्याला फार काळ मैदानात तग धरता आला नाही. रिषभ पंतने त्याला स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. स्टार्कला अवघ्या ५ धावाच करता आल्या. 

पंतचा अचूक निशाणा; थर्ड अंपायरचा निर्णय येण्याआधी स्टार्कनं धरला तंबूचा रस्ता

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ५९ व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेळला. त्यानंतर त्याने एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या नादात तो फसला. पहिली धाव घेताना त्याने दुसऱ्या धावेसाठी कॅप्टन पॅट कमिन्सला कॉल केला होता. पण दुसरी धाव होणार नाही हे लक्षात येताच पॅटनं त्याला नकार दिला. पण पॅट कमिन्स खूप बाहेर निघून आला होता. नितीशकुमार रेड्डीनं पंतकडे थ्रो मारला. पॅट कमिन्स क्रिजमध्ये आहे हे पाहून पंतन चतुराईन नॉन स्ट्राइक एन्डच्या स्टंपवर अचूक निशाणा साधत स्टार्कचा खेळ खल्लास केला.

चपळाई दाखवत साधला अचूक निशाणा

नितीशकुमारनं थ्रो केल्यावर चेंडू हातात येण्याआधीच पंतनं आपल्या उजव्या हातातील ग्लोव्ह्ज काढून फेकले. कारण नॉन स्ट्राइक एन्डवर असलेला स्टार्क धाव घेण्यासाठी खूप पुढे आलाय ते आधीच पाहिले होते. चेंडू हातात आल्यावर क्षणाचाही विलंब न करता पंतनं स्टंपवर अचूक निशाणा साधात संघाला यश मिळवून दिले. 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराह