AUS vs IND, Bails Switching Game Between Mitchell Starc and Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये स्टंपवरील बेल्स अदला-बदलीचा रंगलेला खेळ चांगलाच लक्षवेधी ठरला. हा खेळ आता यशस्वी जैस्वाल अन् मिचेल स्टार्क यांनीही खेळल्याचे पाहायला मिळाले. बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवसाच्या खेळात पंत स्ट्राइकवर असताना मिचेल स्टार्कनं नॉन स्ट्राइक एन्डवरील स्टंपवरील बेल्सची अदला बदल केली. त्यानंतर लेगच यशस्वी जैस्वालनं त्या बेल्स पुन्हा होत्या तशा ठेवल्याचे पाहायला मिळाले.
मियाँ 'मॅजिक विथ बेल्स'; पहिल्या वेळी फसल्यावर मार्नस लाबुशेनं या खेळाचा नादच सोडला
याआधी बॉर्डर गावसकर स्पर्धेतील ब्रिस्बेनच्या मैदानात मोहम्मद सिराजनं मार्नस लाबुशेन सेट झाल्यावर 'बेल्स-मॅजिक'चा खेळ खेळला होता. यावेळी ऑस्ट्रेलियन बॅटरनं आपली विकेटही गमावली. हा खेळ इथंच थांबला नाही मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीही सिराजनं मार्नस लाबुशेनसमोर हा डाव खेळला. पण विकेटच्या धास्तीनं लाबुशेन यावेळी या खेळात सहभागीच झाला नव्हता.
अॅशेस मालिकेत पहिल्यांदा पाहायला मिळाला होता हा सीन
क्रिकेटच्या मैदानात दोन संघातील खेळाडूंमध्ये बेल्स अदला-बदलीचा रंगलेला पहिला सीन हा २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अशा अॅशेस मालिकेत पाहायला मिळाला होता. स्टुअर्ट ब्रॉडनं ऑस्ट्रेलियन बॅटर मार्नस लाबुशेन मैदानात असताना स्टंपवरील बेल्सची अदला बदल केली होती. विशेष म्हणजे त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर मार्नस लाबुशेन कॅच आउट झाला होता.
मॅजिकआडचा 'मांइड गेम'
स्टुअर्ट ब्रॉडची कॉपी करून सिराजनं बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत मार्नस लाबुशेन विरुद्ध 'माइंड गेम' खेळला होता. खरंतर यात मॅजिक असं काहीच नाही. पण बऱ्याचदा अशा गोष्टींमुळं सेट झालेल्या खेळाडूचा फोकस भरकटतो अन् तो विकेट गमावण्याची शक्यता असते. मार्नस लाबुशेनसोबत ते एकदा नव्हे तर दोनदा घडलं. पण स्टार्कचा हा खेळ यशस्वीसमोर अयशस्वीच ठरला. कारण संघ अडचणीत असताना हा खेळ रंगल्यावर यशस्वीनं अर्धशतक पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: Australia vs India 4th Test Day 5 antics are back Th bails switchingis time between Mitchell Starc and Yashasvi Jaiswal Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.