AUS vs IND : पॅट कमिन्ससमोर रोहित पुन्हा अपयशी; केएल राहुलच्या पदरी भोपळा!

पॅट कमिन्सनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 06:46 IST2024-12-30T06:37:00+5:302024-12-30T06:46:23+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs India 4th Test Day 5 Rohit Sharma dismissed for 9 runs Duck for KL Rahul Agianst Pat Cummins | AUS vs IND : पॅट कमिन्ससमोर रोहित पुन्हा अपयशी; केएल राहुलच्या पदरी भोपळा!

AUS vs IND : पॅट कमिन्ससमोर रोहित पुन्हा अपयशी; केएल राहुलच्या पदरी भोपळा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ३४० धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सनं एका ओव्हरमध्ये बॅकफूटवर टाकले. रोहित शर्मा पाठोपाठ केएल राहुलची विकेट घेत त्याने टीम इंडियाला बॅक टू बॅक धक्के दिले. रोहित शर्मा अवघ्या ९ धावा करुन तंबूत परतला. भारतीय संघानं  अवघ्या २५ धावांवर २ विकेट्स गमावल्या.

४० चेंडूत ९ धावा करून तंबूत परतला रोहित, पहिल्या डावातही पॅट कमिन्सनंच केली होती शिकार

ऑस्ट्रेलियन संघानं दिलेल्या ३४० धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मानं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. रोहित पूर्वीच्या तुलनेत उत्तम खेळताना दिसला. वेळ घेत जोडीनं भारतीय संघाची धावसंख्या पुढे सरकवण्याला पसंती दिली. लंचपर्यंत जोडी एकदम सेट होईल अन्   टीम इंडियाची मॅच जिंकण्याची संधी आणखी वाढेल, अशी आशा होती. पण रोहित पुन्हा पॅट कमिन्सला फसला.  ४० चेंडूचा सामना केल्यावर तो ९ धावा करून तंबूत परतला.

रोहितसमोर पॅट कमिन्सचा 'चौकार'

 रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पॅट कमिन्स याने त्याला अधिक टेन्शन दिले.  सातत्याने अपय़शी ठरताना पाहायला मिळाले. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मानं पॅट कमिन्सविरुद्ध ४४ चेंडूत फक्त ११ धावा केल्या. पॅटनं चार वेळा भारतीय कॅप्टनची विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

 

Web Title: Australia vs India 4th Test Day 5 Rohit Sharma dismissed for 9 runs Duck for KL Rahul Agianst Pat Cummins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.