AUS vs IND : किंग कोहलीची पुन्हा तीच चूक! MCG स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्मानं दिली अशी रिअ‍ॅक्शन

स्टार्कच्या गोलंदाजीवर बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या नादात पुन्हा फसला विराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 07:23 IST2024-12-30T07:16:42+5:302024-12-30T07:23:48+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs India 4th Test Day 5 Virat Kohli Out Agianst Mitchell Starc off side deliveries story continues Anushka Sharma reaction Viral | AUS vs IND : किंग कोहलीची पुन्हा तीच चूक! MCG स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्मानं दिली अशी रिअ‍ॅक्शन

AUS vs IND : किंग कोहलीची पुन्हा तीच चूक! MCG स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्मानं दिली अशी रिअ‍ॅक्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli off side deliveries story continues :  मेलबर्न कसोटी सामन्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील निर्णायक दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसला. मिचेल स्टार्कनं लंचआधीच कोहलीला तंबूचा रस्ता दाखवत टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं उपहाराआधी ३३ धावांत ३ विकेट्स गमावल्या आहेत. भारतृ-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही स्टँडमध्ये उपस्थितीत होती. कोहलीनं तीच चूक पुन्हा केली अन् त्याची विकेट पडल्यावर अनुष्काचा चेहराही पडला. 

अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल 

विराट कोहलीची विकेट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती. त्याची विकेट पडल्यावर स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काचा चेहराच पडला. सोशल मीडियावर तिची रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे.  बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी अनुष्का शर्मासोबत अथिया शेट्टीही टीम इंडियाला सपोर्ट देण्यासाठी MCG स्टेडियमवर पोहचल्याचे पाहायला मिळाले. केएल राहुलची विकेट पडल्यावरही दोघींची  रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. केएल राहुलला खातेही उघडता आले नाही.  विराट कोहलीनं खाते उघडलं पण त्याला दुहेरी आकडा गाता आला नाही. 

सामना जिंकण्याचा विचार बाजूला ठेवून, कसोटी वाचवण्याचे चॅलेंज

भारतीय संघानं २५ धावांवर पहिल्या दोन विकेट्स गमावल्यानंतर सर्वांच्या नजरा या विराट कोहलीवर होत्या. पहिल्या डावात विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असला तरी बाहेरच्या चेंडू सोडत त्याने लाखे चाहत्यांना मोठा दिलासा दिला. पण पुन्हा एकदा त्याला बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा मोह झाला अन् टीम इंडियाच्या अडचणीत त्याने भर घातली.  आघाडीच्या फळीतील तिघांनी नांगी टाकल्यामुळे भारतीय संघासमोर सामना जिंकण्याचा विचार बाजूला ठेवून कसोटी वाचवण्याचे चॅलेंज निर्माण झाले आहे. 

Web Title: Australia vs India 4th Test Day 5 Virat Kohli Out Agianst Mitchell Starc off side deliveries story continues Anushka Sharma reaction Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.