AUS vs IND, Virat Kohli was slammed for shoulder bumping Australia debutant Sam Konstas During Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात सुरु आहे. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. नॅथन मॅकस्विनीच्या जागी संघात संधी मिळालेल्या १९ वर्षीय सॅम कोन्स्टास (Sam Konstas) याने उस्मान ख्वाजाच्या साथीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकावले. आक्रमक अंदाजात फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या युवा बॅटरला विराट कोहलीनं खांद्यानं धक्का मारल्याचा सीन पाहायला मिळाला. त्यानंतर दोघांच्यात स्लेजिंगचा खेळही रंगल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
..अन् किंग कोहलीनं खांदा मारत युवा बॅटरला दिला धक्का
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १० व्या षटकात मेलबर्नच्या मैदानात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सॅम कोन्स्टास आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कोहलीनं खांदा मारत धक्का दिल्यावर युवा बॅटर चिडला. दोघांच्यात वातावरण तापलं असताना पंच आणि नॉन स्ट्राइकवर असेलेल्या उस्मान ख्वाजानं प्रकरण मिटवलं. विराट कोहलीनं जे कृत्य केलं ते धक्कादायक असेच होते. सॅमचा तोरा बघून त्याने हा डाव खेळला असावा. न कळत धक्का लागला या अंदाजात त्याने युवा बॅटरला टक्कर मारली. या प्रकरणामुळे विराट कोहली आयसीसी रडारवर आला आहे. लक्ष नव्हतं चुकून घडलं असं म्हणून तो सुटणार की, त्याला याची किंमत मोजावी लागणार ते पाहण्याजोगे असेल.
पदार्पणात सॅम कोन्स्टासनं झळकावलं जलद अर्धशतक
सॅम कोन्स्टास (Sam Konstas) पदार्पणात जलदगतीनं अर्धशतकी खेळणारा सलामीवीरही ठरला आहे. त्याने ५२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कसोटीत पदार्पणात जलदग अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने १९९९ मध्ये पदार्पणाच्या सामन्यात ४६ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याच्याशिवाय ॲश्टन ॲगर याने २०१३ मध्ये ५० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. पण या दोन्ही बॅटर्संनी सलामीला येऊन ही कामगिरी केली नव्हती.
सॅम कोन्स्टासनं बुमरहाच्या गोलंदाजीवर केली आक्रमक बॅटिंग
सॅम कोन्स्टास याने पदार्पणाच्या आधी टीम इंडियाविरुद्धच्या कॅनबेरा येथील सराव सामन्यात शतकी खेळी केली होती. पण त्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहनं गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे युवा बॅटर बुमराहचा सामना कसा करणार? याकडे सर्वांच्या नजरा होत्या. बुमराहची पहिलं षटक निर्धाव खेळल्यावर सॅमनं भारताच्या स्टार गोलंदाजाविरुद्ध आक्रमक अंदाजात बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या १८ चेंडूत त्याने फक्त दोन धावा केल्या. पण त्यानंतर त्याने गियर बदलला. बुमराहच्या चौथ्या षटकात सॅमनं दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४ धावा घेतल्या. एवढेच नाही तर टेस्टमधील नंबर वन गोलंदाजाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या डावातील ११ व्या षटकात त्याच्या भात्यातून १८ धावा आल्याचेही पाहायला मिळाले. रवींद्र जडेजानं त्याच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. सॅमनं ६५ चेंडूत ६० धावांची खेळी करत पहिल्या सेशनमध्ये हवा केली.
Web Title: Australia vs India 4th Test Virat Kohli was slammed for shoulder bumping Australia debutant Sam Konstas During Boxing Day Test Melbourne Video Goes Viral Watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.