Australia vs India 5th Test Day 2 Jasprit Bumrah And Mohammed Siraj Strikes Early : सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिलीये. कॅप्टन जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या दिवसाच्या खेळात मार्नस लाबुशेनच्या २ (८) रुपात ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. दुसऱ्या बाजूनं मोहम्मद सिराज याने एका षटकात दोन विकेट्स घेत "हम भी है तैयार..." या तोऱ्यात कॅप्टनला साथ देत कांगारूंच्या आघाडी फळीतील फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. सिराजनं सलामीवीर सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) २३ (३८) पाठोपाठ ट्रॅविस हेडची ४ (३) शिकार केली. ऑस्ट्रेलियानं ३९ धावांवर आपली चौथी विकेट गमावली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात पहिल्या तासाभरात ऑस्ट्रेलियानं ३९ धावांत ३ विकेट्स गमावल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहचा आत्मविश्वास; यशस्वी रिव्ह्यूवसह मार्नस लाबुशेनचा खेळ केला खल्लास
सॅम कॉन्स्टास आणि मार्नस लाबुशेन या जोडीनं १ बाद ९ धावांवरून दुसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात केली. भारताकडून एका बाजूनं जसप्रीत बुमराह आणि दुसऱ्या बाजूनं मोहम्मद सिराज ही जोडी गोलंदाजी करताना दिसली. दुसऱ्या दिवसाच्या खेळातील चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाच्या मध्यफळीतील मार्नस लाबुशेनला पंतकरवी झेल बाद केले. या विकेटसाठी जोरदार अपील केल्यावर मैदानातील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. पण कॅप्टन बुमराहनं आत्मविश्वासानं क्षणार रिव्ह्यू घेतला अन् तिसऱ्या पंचांनी भारताच्या बाजूनं निर्णय दिला. चेंडू बॅटची कड घेऊन पंतच्या हाती गेल्याचे स्निको मीटरमध्ये स्पॉट झालं अन् मार्नस लाबुशेनचा खेळ खल्लास झाला.
सिराजनं एका ओव्हरमध्ये घेतल्या २ विकेट्स
मोहम्मद सिराजनं सलामीवीर सॅम कॉन्स्टास याच्या रुपात आपली पहिली विकेट घेतली. युवा सलामीवीरानं जसप्रीत बुमराहासमोर टिकण्यासाठी आक्रमक अंदाजात फटकेबाजी करण्याला पसंती दिली. पण दुसऱ्या बाजूनं सिराज आला अन् ऑस्ट्रेलियन सलामीवीर त्याच्या जाळ्यात फसला. यशस्वी जैस्वालनं त्याचा झेल टिपला. याच षटकात सिराजनं मालिकेत टीम इंडियाला दमवणाऱ्या ट्रॅविस हेडला स्वस्तात माघारी धाडले. भारतीय संघानं पहिल्या डावात १८५ धावा केल्यावर या सामन्यात कमबॅक करण्याची मोठी जबाबदारी गोलंदाजांच्या खांद्यावर येऊन पडलीये. बुमराहनं ती जबाबदारी उचलल्यावर दुसऱ्या बाजूनं मोहम्मद सिराजनं चार्ज घेत कॅप्टनला उत्तम साथ दिली.
Web Title: Australia vs India 5th Test Day 2 Jasprit Bumrah And Mohammed Siraj Strikes Early on Day 2 Marnus Labuschagne Sam Konstas Travis Head dismissing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.