सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघानं दिलेल्या १६२ धावांचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. तब्बल दहा वर्षांनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्यात ऑस्ट्रेलियाला यशस्वी ठरलीये. २०१४-१५ च्या हंगामानंतर ऑस्ट्रेलियानं ही मालिका जिंकली आहे. या आधीच्या पाच मालिकेत भारतीय संघानं ४ वेळा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्जा केला होता. पण यावेळी टीम इंडिया ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्यात अपयशी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियानं दशकभराचा दुष्काळ संपवला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ज्या ज्या वेळी भारतीय फलंदाजी ढेपाळली त्या त्या वेळी जसप्रीत बुमराहनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजीची उणीव भरून काढली. पण सिडनी कसोटी सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला अन् अल्प धावसंख्येचा बचाव करण्यात टीम इंडिया असर्थ ठरली. जर बुमराह गोलंदाजीसाठी फिट असता तर कदाचित सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा निकाल भारताच्या बाजूनं असता. पण तो डगआउटमध्ये बसला अन् भारतीय गोलंदाजीचा 'कणा'च मोडला. याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन संघानं १० वर्षांचा दुष्काल संपवला. एवढेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच तिकीटही पक्कं केले.
१२ धावांत टीम इंडियानं गमावल्या चार विकेट्स
सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ६ बाद १४५ धावांवरून खेळाला सुरुवात केली. हा सामना जिंकून मालिका २-२ बरोबरी राखण्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी तिसऱ्या दिवशी भारतीय संघ कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. पण तिसऱ्या दिवसाच्या तासाभरात फक्त १२ धावांत उर्वरित ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय संघाचा दुसरा डाव १५७ धावांत आटोपला.
बुमराहची कमी; ऑस्ट्रेलियासाठी होती विजयाची हमी
पहिल्या डावातील ४ धावांच्या अल्प आघाडीसह टीम इंडियाला १६१ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियन संघ १६२ धावांच्या धावांचे पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. जसप्रीत बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे फिल्डवर नसल्यानं ऑस्ट्रेलियाचं फावलं. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत बुमराहसमोर ऑस्ट्रेलियन सलामीवीर चांगलाच संघर्ष करताना दिसला. पण बुमराह आउट झाला अन् दुसऱ्या डावात त्याने खेळी बरण्याचा डाव साधला. १६२ या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. उस्मान ख्वाजानं ४५ चेंडूत ४१ धावा करत सर्वाधिक धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णानं तीन विकेट्स घेत सामन्यात अजूनही जान आहे, अशी परिस्थितीत निर्माण केली होती. पण त्यानंतर ट्रॅविस हेड ३४ (३८)* आणि बो वेब्स्टर ३९ (३४)* जोडी जमली आणि ऑस्ट्रेलियानं ६ विकेट्स राखून सामना अगदी सहज जिंकला.