अॅडलेड - भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या अॅडलेड कसोटी मालिकेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत संपुष्टात आला आहे. तर टीम इंडियाकडे पहिल्या डावात केवळ 15 धावांची आघाडी आहे. टीम इंडियातील आर.अश्विन आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं दोन बॅट्समननं तंबूत पाठवलं. ट्रेविस हेड (72) आणि जोश हेजलवुड (0) या दोघांची विकेट मोहम्मद शमीनं घेतली. बुमराहनं मिशेल स्टार्कचा बळी मिळवला. दरम्यान, सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय सुरूच होता. भारतीय गोलंदाज इशांतनं ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचचा बळी मिळवला. वेगवान गोलंदाज असलेल्या इशांत शर्मानं पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फिंचला बाद केलं. त्यामुळे फिंचला भोपळाही न फोडता माघारी परतावं लागलं आहे. तत्पूर्वी चेतेश्वर पुजाराने केलेल्या चिवट शतकी खेळीच्या जोरावर भारताने अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावंपर्यंत मजल मारली होती. भारताची आघाडीची फळी कोलमडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाहुण्यांना झटपट गुंडाळेल असे वाटत होते. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने वैयक्तिक शतकी खेळीसह सहकाऱ्यांसोबत केलेल्या छोटेखानी भागीदारींच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावा केल्या. पण, टीम इंडियाला जिंकायंच असेल तर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे.
LIVE UPDATES :
भारताला मोठा धक्का, विराट कोहली आऊट
भारताकडे दीडशे धावांची आघाडी, कोहली-पुजाराची जोडी जमली
भारताकडे 101 धावांची आघाडी
भारताला दुसरा धक्का : लोकेश राहुल 44 धावांवर बाद
जोश हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर लोकश राहुलवर आउट झाला.
- भारताला पहिला धक्का, बाहेर जाणाऱ्या चेंडूवर मुरली विजय 'आउट'
सामन्यामध्ये वारंवार पावसाचा व्यत्यय
टी पेन 5 धावांवर बाद; इशांत शर्माने घेतली विकेट; ऑस्ट्रेलिया 127/6.
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का; हॅन्ड्सकोम्ब 34 धावांवर बाद; बुमराहने घेतली विकेट
ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण; भारतावार आघाडीसाठी 151 धावांची गरज; 6 विकेट हाती. ट्रॅविस हेड आणि पी हॅण्डसकोम्ब क्रीजवर
उमर ख्वाजा 28 धावांवर बाद; आश्विनने घेतली तिसरी विकेट; ऑस्ट्रेलिया 4 बाद 87 धावा.
ऑस्ट्रेलिया 36 ओव्हरनंतर 81/3. हँडस्कोम्ब 16 तर ख्वाजा 27 वर खेळत आहेत.
पीटर हँडस्कोम्ब आणि उस्मान ख्वाजा क्रीझवर; ऑस्ट्रेलिया 30 ओव्हरमध्ये 63/3
शॉन मार्श दोन धावांवर आऊट; आश्विनने घेतली विकेट, ऑस्ट्रेलिया 59/3
ऑस्ट्रेलिया 27 ओव्हरनंतर दोन बाद 58. शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा क्रीजवर.
एम. हॅरीस 26 धावांवर बाद
- चेतेश्वर पुजाराचे शतक पूर्ण, कसोटी क्रिकेटमधील पुजाराचे हे 16 वे शतक
- पुजाराच्या पाच हजार कसोटी धावा पूर्ण - स्टार्कने उडवला इशांत शर्माचा त्रिफळा, भारताला आठवा धक्का
- भारताच्या दोनशे धावा पूर्ण
- रविचंद्रन अश्विन बाद, भारताला सातवा धक्का
- आघाडीच्या फळीने निराशा केल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन अश्विनने सावरला भारताचा डाव
- चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक पूर्ण
अॅडलेड - आजपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघासमोर भारतीय संघाची अवस्था बिकट झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात चार गडी गमावणाऱ्या भारतीय संघाला चहापानापर्यंत अजून दोन धक्के बसले आहेत. दुसऱ्या सत्रात रोहित शर्मा (37) आणि रिषभ पंत (25) हे खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद झाल्याने चहापानापर्यंत भारताच्या 6 बाद 143 धावा झाल्या आहेत. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा एकाकी झुंज देत खेळपट्टीवर उभा आहे.
- रिषभ पंत 25 धावांवर बाद, भारताचा सहावा फलंदाज तंबूत
- भारताच्या 100 धावा पूर्ण, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत मैदानात
- रोहित शर्मा 37 धावांवर बाद, भारताला पाचवा धक्का
- IND v/s AUS : उपाहारापर्यंत भारताच्या 4 बाद 56 धावा
अॅडिलेड- भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या चार कसोटी मालिकांमधला पहिला सामना अॅडिलेड इथल्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 20 धावांच्या आतच भारताच्या सलामीच्या फलंदाजासह तिघे माघारी परतले. भारतानं के. एल. राहुलच्या रुपात पहिला बळी गमावला. वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडनं फिंचकरवी राहुलला झेलबाद केले. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. मिचेल स्टार्कनं भारताचा दुसरा सलामीवीर मुरली विजयला (11) घरचा रस्ता दाखवला. पॅट कमिन्सनं भारताचा कर्णधार विराट कोहलीचा बळी मिळवला आहे. तर हेजलवुडच्या गोलंदाजीवर रहाणे झेलबाद झाला आहे. उपाहारापर्यंत भारताच्या चार बाद 56 धावा झाल्या होत्या
अॅडिलेड- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या चार कसोटी मालिकांमधला पहिला सामना अॅडिलेड इथल्या ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.