Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या  यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:38 PM2024-11-18T17:38:28+5:302024-11-18T17:39:40+5:30

whatsapp join usJoin us
Australia vs Pakistan 3rd T20I Babar Azam Breaks Virat Kohli Record Become Second Highest Run Scorer T20I Just Behind Rohit Sharma | Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात

Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Australia vs Pakistan 3rd T20I Babar Azam Breaks Virat Kohli Record : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात बाबर आझमनं एकाकी झुंज दिली. पाक संघाकडून त्याने सर्वाधिक धावसंख्या उभारली. पण पुन्हा एकदा तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर फसला. त्यातही त्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडित काढला आहे. 

बाबरचं अर्धशतक हुकलं, त्यातही त्यानं साधला किंग कोहलीचा 'विराट' विक्रम मोडण्याचा डाव

होबार्टच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा संघ निर्धारित २० षटकेही खेळू शकला नाही. मालिका आधी गमावलेल्या पाकिस्तान संघानं १८.१ षटकात ११७ धावांपर्यंतच मजल मारली. या सामन्यात माजी कॅप्टन बाबर आझम याने २८ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. त्याच अर्धशतक ९ धावांनी हुकलं. पण त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या  यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

बाबरनं ३८ धावा करताच किंग कोहली पडला मागे 

बाबर आझम हा  गेल्या काही सामन्यात अपयशी ठरताना दिसला असला तरी छोट्या फॉर्मेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण धावा केल्याचे पाहायला मिळाले आहे. याच जोरावर त्याने कोहलीचा विराट विक्रम मोडित काढत टी-२० मध्ये आपली छाप सोडलीये. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या कोहलीनं १२५ सामन्यातील ११७ डावात ४८.६९ च्या सरासरीनं ४१८८ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक अन् ३८ अर्धशतकांसा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ३८ धावा करताच बाबर आझमनं  किंग कोहलीला मागे टाकले. 

 रोहितलाही मागे टाकून एका डावातही होऊ शकतो टॉपर

बाबर आझमनं १२६ सामन्यातील ११९ डावात ४१९२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून ३ शतकासह ३६ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्मानं १५९ टी-२० सामन्यातील १५१ डावात ५ शतक आणि ३२ अर्धशतकाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४२३१ धावा केल्या आहेत. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मानंही या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असून बाबर आझमला टॉपला पोहचण्यासाठी फक्त ४० धावांची गरज आहे. 

Web Title: Australia vs Pakistan 3rd T20I Babar Azam Breaks Virat Kohli Record Become Second Highest Run Scorer T20I Just Behind Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.