पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेत ऐतिहासिक कामगिरी केल्यावर पाकिस्तान संघानं टी-२० मालिका गमावली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ३ सामन्यांच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेतील शेवटचा सामना होबार्टच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यात पाकच्या प्लेइंग इलेव्हनमधून पाकिस्तानी कॅप्टनच गायब झाल्याचा सीन पाहायला मिळाला.
अन् मोहम्मद रिझवान झाला ट्रोल
ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-२० मालिका गमावल्यावर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात मोहम्मद रिझवानऐवजी सलमान अली आगा नाणेफेकीसाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद रिझवानशिवाय नसीम शहा प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाले. पाक संघाच्या कॅप्टननं स्वत:ला ड्रॉप करून नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा खेळलेला हा डाव त्याच्यावर उलटल्याचे दिसते. कारण सोशल मीडियावर यामुद्यावरून तो ट्रोल होताना दिसतोय. मालिका गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यातून बाहेर बसत तो बाबर आझमला बळीचा बकरा करायला मोकळा झाला, अशा आशयाच्या कमेंट्ससह मोहम्मद रिझवान याच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० सामन्यात कॅप्टनचा फ्लॉप शो
वनडे मालिका जिंकल्यावर पाक कॅप्टन मोहम्मद रिझवान याने टीी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश करण्याची भाषा केली होती. पण पहिल्याच सामन्यात पाकला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यासह ऑस्ट्रेलियाने मालिका आपल्या नावे करत पाकिस्तानला व्हाइट वॉशच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. मोहम्मद रिझवान याने दुसऱ्या टी-२० सामन्यात १६ चेंडूत २६ धावांची खेळी केली होती. त्याआधी पावसाच्या व्यत्ययामुळे ७ ओव्हरच्या सामन्यात त्याच्या पदरी भोपळा आला होता. तिसऱ्या सामन्यात मोहम्मद रिझवानच्या जागी पाक संघात हसीबुल्लाह खानची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले.
संघाला संकटात टाकून कॅप्टननं घेतला विश्रांतीचा निर्णय
वनडे मालिकेत इतिहास रचल्यावर पाकिस्तानचा संघ टी-२० मालिककेत संकटात सापडला. व्हाइट वॉशची लाजिरवाणी वेळ टाळण्याचं चॅलेंज असताना कॅप्टन रिझवान याने विश्रांती घेणं अनेकांना खटकलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या या निर्णयानंतर नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत.
Web Title: Australia vs Pakistan, 3rd T20I Mohammad Rizwan Dropped Himself From Playing XI Against Australia Fans Trolled Him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.