ICC Women's T20 World Cup, Semi-Final: भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. गटातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडला बसलेल्या या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोटातही तशीच धाकधुक होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीचा सामन्यातही पावसानं खोडा घातला असता तर ऑस्ट्रेलियालाही गाशा गुंडाळावा लागला असता. पण, पावसाने विश्रांती घेतली आणि कांगारुंचा जीव भांड्यात पडला. ऑस्ट्रेलियानं 20 षटकं खेळून काढल्यानंतर पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे ऑसींची कोंडी झाली.
दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांना दमदार सलामी देण्यात अपयश आले. हिली ( 18 ) पाचव्या षटकात माघारी परतली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगनं दुसऱ्या विकेटसाठी मुनीसह संघाचा डाव सावरला. नॅडीने क्लेर्कने ही जोडी तोडली. मुनी ( 28) माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा गडगडला. जेस जॉनासेन ( 1), अॅश्लेघ गार्डनर ( 0) झटपट माघारी परतल्या. पण, एका बाजूनं लॅनिंग खिंड लढवत होती. राचेल हायनेस ( 17) हीला क्लेर्कने बाद करून ऑसींना पाचवा धक्का दिला. क्लेर्कने 19 धावांत तीन फलंदाज बाद केले.
झटपट विकेट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेगही मंदावला. त्यामुळे त्यांना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 134 धावांवर समाधान मानावे लागले. लॅनिंग 49 धावांवर नाबाद राहिली. मात्र पहिल्या इनिंगनंतर पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावल्यामुळे दक्षिण अफ्रिकेसमोर या पुढीलप्रमाणे विजयासाठी सुधारित लक्ष्य ठेवले जाऊ शकते.
19 षटकांत - 130 धावा 18 षटकांत - 125 धावा17 षटकांत - 120 धावा16 षटकांत - 115 धावा15 षटकांत - 110 धावा14 षटकांत - 104 धावा13 षटकांत - 98 धावा10 षटकांत- 79 धावा