मेलबर्नः इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या आधीच अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे संघाच्या बाहेर जावं लागलं आहे. या यादीत आता ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन यांचं नाव जोडलं गेलं आहे. ज्यांच्या खांद्याला दुखापत झाल्यानं त्यांना वर्ल्ड कप संघाच्या बाहेर बसावं लागणार आहे. त्यांच्याऐवजी बोर्डानं केन रिचर्डसन यांना संधी दिली आहे. मार्चमध्ये पाकिस्तानविरोधातल्या दुसऱ्या वनडेमध्ये झाय रिचर्डसन जखमी झाले होते. त्यानंतरही त्यांचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला होता. भारतात झालेल्या वनडे सीरिजमध्येही त्यांनी उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन केलं होतं आणि पाच सामन्यात सात बळी मिळवले होते. त्यानंतर त्यांना संघातील प्रमुख गोलंदाज समजलं जात होतं.
गेल्या 12 सामन्यात त्यांनी 24 बळी मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल स्टाफनं त्यांची तपासणी केली असता ते वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पूर्णतः तंदुरुस्त नसल्याचं समोर आलं होतं. ऑस्ट्रेलिया टीमच्या डेव्हीड बेकली यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. बेकली म्हणाले, ही बातमी टीम आणि झायसाठी दुर्दैवी आहे. गेल्या काही काळापासून झाय शानदार प्रदर्शन करत आहे. परंतु ते वर्ल्ड कपसाठी खेळण्यास तंदुरुस्त नसल्याचं मेडिकल चेकअपमधून उघड झालं.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं झाय रिचर्डसनच्या जागी केन रिचर्डसनला संघात जागा दिली आहे. निवड समितीनं जोश हेजलवुडच्याऐवजी केनची निवड केली होती. हेजलवुडला संघात राखीव खेळाडू ठेवण्यात आलं होतं. पाठीच्या दुखण्यामुळे ते संघातून बाहेर गेले होते. झाय रिचर्डसन यांना इंग्लंडविरोधात होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ए संघातून खेळण्याची इच्छा आहे.
Web Title: australia wc squad jhye richardson rules out shoulder injury replace by kane richardson
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.