Join us  

एवढं दमवल्यानंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणार कसा?; व्यग्र वेळापत्रकात आणखी दोन मालिकांचा शिरकाव? 

आयर्लंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, झिम्बाव्बे, आशिया चषक असे सातत्याने खेळून भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी दाखल होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 8:27 PM

Open in App

आयर्लंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, झिम्बाव्बे, आशिया चषक असे सातत्याने खेळून भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी दाखल होणार आहे. सततच्या दौऱ्यामुळे आधीच सीनियर खेळाडू विश्रांती घेत आहेत आणि त्यात दुखापतींचे प्रमाणही वाढताना दिसतेय.. अशात आशिया चषक व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यांच्यातल्या मधल्या वेळेत भारतीय संघाला आणखी दोन मालिका खेळाव्या लागू शकतात. तशी माहिती समोर येत आहे.

इंग्लंडविरुद्धची  वन डे मालिका 

  • दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
  • तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

 

भारताचा विंडीज दौरा

  • पहिली वन डे - २२ जुलै
  • दुसरी वन डे - २४ जुलै
  • तिसरी वन डे - २७ जुलै
  • पहिली ट्वेंटी-२० - २९ जुलै
  • दुसरी ट्वेंटी-२० - १ ऑगस्ट
  • तिसरी ट्वेंटी-२० - २ ऑगस्ट
  • चौथी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट
  • पाचवी ट्वेंटी-२० - ७ ऑगस्ट 

 

इंग्लंड दौरा १७ जुलैला संपल्यानंतर २२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात होणार. तीन वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांचा हा दौरा ७ ऑगस्टला संपणार. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. तेथे तीन वन डे सामने खेळल्यानंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंका किंवा बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळणे अपेक्षित होते. पण, ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत भारतात तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार असल्याचे Cricbuzz ने म्हटले आहे. पण, या दौऱ्यार वन डे सामने खेळायचे की नाही, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.  

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

  • 23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
  • 27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
  • 30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
  • 2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
  • 6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
  • १३ नोव्हेंबरला अंतिम सामना
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App