Join us  

मालिका ऑस्ट्रेलियाच जिंकणार! गेल्या सहा महिन्यांत संघात झाली आहे सुधारणा

यावेळी वॉचे ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक भारतीय पद्धतीने स्वागत झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:46 AM

Open in App

ओमकार गावंड 

मुंबई : ‘गेल्या सहा महिन्यांत ऑस्ट्रेलिया संघाने दमदार कामगिरी केली आहे. या जोरावर भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाबाजी मारेल,’ असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार स्टिव्ह वॉ याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.मानखुर्द येथील चिल्ड्रेन्स एड सोसायटी, मुंबई संचालित चेंबूर चिल्ड्रेन्स होममध्ये वॉ याने सोमवारी भेट दिली.

या वेळी वॉचे ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक भारतीय पद्धतीने स्वागत झाले. वॉने नवोदितांना अडीच-तीन तास क्रिकेट प्रशिक्षण दिले. तो स्वत: नेटजवळून मुलांची शैली कॅमेऱ्यात कैद करून घेत होता. या वेळी वॉने संवाद साधत मंगळवारपासून सुरू होणाºया भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेविषयी मत मांडले. त्याने म्हटले, ‘भारत वि. आॅस्ट्रेलिया मालिका अत्यंत अटीतटीची होईल. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील. ऑस्ट्रेलियाने मागील ६ महिन्यांत आॅस्ट्रेलिया चांगले क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे संघामध्ये अतिशय चांगली सुधारणा होत आहे. या जोरावर ऑस्ट्रेलिया यजमानांविरुद्ध २-१ असे जिंकतील.’‘कसोटी सामना पाचदिवसीयच असायला हवा’कसोटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ पाहण्यास मिळतो. अनेकदा पाचदिवसीय कसोटी सामना अखेरच्या क्षणी रोमांचक पद्धतीने अनिर्णीत राहतात. यामुळे कसोटी सामन्यासाठी पाच दिवस मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच चार दिवसांऐवजी कसोटी सामना पाच दिवसांचाच ठेवला पाहिजे. - स्टीव्ह वॉ

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया