ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडची पराभवाची हॅटट्रिक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आजपासून ऐतिहासिक अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 10:06 AM2019-08-01T10:06:45+5:302019-08-01T10:07:24+5:30

whatsapp join usJoin us
Australia women's win the Ashes series, beat England by 12-4 margin | ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडची पराभवाची हॅटट्रिक

ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस मालिका जिंकली, इंग्लंडची पराभवाची हॅटट्रिक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आजपासून ऐतिहासिक अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप विजयानंतर ही पहिलीच महत्त्वाची मालिका असल्यानं इंग्लंडच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बर्मिंगहॅम येथे अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. त्यामुळे यंदा घरच्या मैदानावर विजय मिळवून पुन्हा अ‍ॅशेस आपल्याकडे आणण्याचा इंग्लंडचा निर्धार आहे. 

पण, पुरुषांच्या अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच यजमानांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियानं महिलांच्या अ‍ॅशेस मालिकेत 12-4 असा विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या महिला संघाला सलग तिसऱ्यांदा अ‍ॅशेस मालिका गमवावी लागली.




ब्रिसबन येथे बुधवारी झालेल्या महिलांच्या अ‍ॅशेस मालिकेतील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची घोडदौड थांबवली. पण, अ‍ॅशेस मालिकेतील हा केवळ औपचारिक सामना राहिला होता. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी ही मालिका केव्हाच जिंकली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या मालिकेत 1 कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात आले. त्यातील कसोटी सामना हा अनिर्णीत राहिल्यानं दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण देण्यात आले. वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियानं 3-0 असं निर्भेळ यश मिळवले. त्यानंतर ट्वेंटी-20 तही ऑस्ट्रेलियानं 2-1 अशी बाजी मारली. 


Web Title: Australia women's win the Ashes series, beat England by 12-4 margin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.