बटलरची झुंज व्यर्थ, इंग्लंड पुन्हा पराभूत; ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी २७५ धावांनी जिंकली

दिवस-रात्र सामन्यात इंग्लंडपुढे ४६८ धावांचे लक्ष्य होते, मात्र पाहुणा संघ केवळ १९२ पर्यंतच मजल गाठू शकला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:33 AM2021-12-21T07:33:24+5:302021-12-21T07:34:48+5:30

whatsapp join usJoin us
australia won the second ashes test by 275 runs england defeated again | बटलरची झुंज व्यर्थ, इंग्लंड पुन्हा पराभूत; ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी २७५ धावांनी जिंकली

बटलरची झुंज व्यर्थ, इंग्लंड पुन्हा पराभूत; ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी २७५ धावांनी जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ॲडिलेड : येथे सोमवारी दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २७५ धावांनी नमवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र सामन्यात इंग्लंडपुढे ४६८ धावांचे लक्ष्य होते, मात्र पाहुणा संघ केवळ १९२ पर्यंतच मजल गाठू शकला. 

अखेरच्या दिवशी सर्वांच्या नजरा जोस बटलरवर होत्या. बटलरने सुरुवातीच्या दोन सत्रात कांगारूंचा यशस्वी सामना केला. त्याने तब्बल २०७ चेंडू टोलवून २६ धावा केल्या. ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून झाय रिचर्डसनने भेदक मारा करीत अर्धा संघ बाद केला. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करणारा मार्नस लाबुशेन सामन्याचा मानकरी ठरला. त्याआधी बटलर-वोक्स यांनी सातव्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी केली. झाय रिचर्डसनने वोक्सला बाद करीत ही जोडी फोडली. ओली रॉबिन्सन-बटलर यांनी आठव्या गड्यासाठी ८७ चेंडू खेळून १२ धावा काढल्या. रॉबिन्सनने नॅथन लियोनला बाद करीत सहकाऱ्यांचा उत्साह वाढविला.

आघाडीच्या फलंदाजांची शरणागती

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली. केवळ ८६ धावांत त्यांचे पाच फलंदाज माघारी परतले होते. सलामीचा हसीब हमीद ००, रोरी बर्न्स ३४, कर्णधार ज्यो रुट २४, डेव्हिड मलान २० आणि ओली पोप ४ हे पाठोपाठ बाद झाले. सामना वाचविण्याची जबाबदारी बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्या खांद्यावर होती. स्टोक्स २०१९ च्या लीड्स कसोटीतील चमकदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला. केवळ १२ धावा काढून तो बाद झाला.

मागच्या ॲशेस मालिकेत विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाने मालिकेत सुरुवातीला २-० अशी आघाडी घेतल्यामुळे  पुढची कसोटी अनिर्णीत सोडविली तरी त्यांना ॲशेस कायम राखता येणार आहे.  ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र कसोटीत सलग नववा विजय साजरा केला. पहिला सामना त्यांनी नऊ गड्यांनी जिंकला होता.

धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४७३ घोषित. इंग्लंड पहिला डाव २३६, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : ९ बाद २३० धावांवर घोषित. 

इंग्लंड दुसरा डाव : रोरी बर्न्स झे. स्मिथ गो. रिचर्डसन ३४,  हसीब हमीद झे. केरी गो. रिचर्डसन ००, डेव्हिड मलान पायचित गो. नेसर २०, ज्यो रुट झे. केरी गो. स्टार्क २४, बेन स्टोक्स पायचित गो. लियोन १२, ओली पोप झे. स्मिथ गो. स्टार्क ४, जोस बटलर हिटविकेट गो. रिचर्डसन २६, ख्रिस वोक्स त्रि. गो. रिचर्डसन ४४, ओली पोप झे. स्मिथ गो. लियोन ८, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ९, जेम्स ॲन्डरसन झे. ग्रीन गो. रिचर्डसन २, अवांतर ९, एकूण : ११३.१ षटकात सर्वबाद १९२ धावा. बाद क्रम : १-४,२-४८,३-७०,४-८२,५-८६,६-१०५,७-१६६,८-१७८,९-१८२,१०-१९२. गोलंदाजी :  मिशेल स्टार्क २७-१०-४३-२, झाय रिचर्डसन १९.१-९-४२-५, नॅथन लियोन ३९-१६-५५-२, मायकेल नेसर १३-५-२८-१,कॅमेरुन ग्रीन ९-५-९-०,  मार्नस लाबुशेन ४-२-१०-०, स्टीव्ह स्मिथ १-१-०-०, ट्राविस हेड १-१-०-०.
 

Web Title: australia won the second ashes test by 275 runs england defeated again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.