नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीनंतर केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी संयमी खेळ करताना भारताचा पराभव टाळण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने पाचव्या वन डेत 35 धावांनी विजय मिळवून मालिका 3-2नं खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या 272 धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ 237 धावांत तंबूत परतला.
09:16 PM
ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली, 35 धावांनी विजय
08:55 PM
पॅट कमिन्सने एकाच षटकात भुवनेश्वर कुमार व केदार जाधव यांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला.
08:53 PM
केदार जाधवला तोलामोलाची साथ देणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा अडथळा पॅट कमिन्सने दूर केला. भुवनेश्वरने 46 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 2 षटकार व 3 चौकारांचा समावेश होता.
07:37 PM
रोहित शर्माला 53 धावांवर असताना ग्लेन मॅक्सवेलने जीवदान दिले
07:06 PM
शिखर धवन आणि विराट कोहली लवकर माघारी परतल्यानंतर बढती मिळालेल्या रिषभ पंतला मोठी खेळी करता आलेली नाही. चौथ्या सामन्यातील अपयश मागे टाकून त्याला आज छाप पाडण्याची संधी होती, परंतु त्यानं तिही गमावली. अवघ्या 16 धावांवर तो माघारी परतला. त्यामुळे वर्ल्ड कप साठीच्या संघात त्याचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे,
07:01 PM
उस्मान ख्वाजाचं नाणं खणखणीत वाजलं, डिव्हिलियर्स व विलियम्सन यांनाही मागे टाकलं
07:00 PM
सलामीवीर म्हणून रोहित शर्माच ठरला अव्वल
06:46 PM
विराट कोहली आणि रोहित शर्मा या जगातील अव्वल दोन फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना भारतीय संघाला आशेचा किरण दाखवला. मात्र, 13व्या षटकात मार्कस स्टॉयनिसने भारतीय कर्णधाराला बाद केले. कोहली 22 चेंडूंत 2 चौकारांसह 20 धावा केल्या.
06:05 PM
खणखणीत चौकार खेचून डावाची सुरुवात करणारा शिखर धवन 12 धावांवर माघारी परतला.
05:03 PM
भुवनेश्वर कुमारने पॅट कमिन्सला अजबरित्या बाद केले.
04:48 PM
अॅलेक्स करीला माघारी पाठवून मोहम्मद शमीनं भारताला 7 वे यश मिळवून दिले.
04:42 PM
उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनी झटपट माघारी फिरण्याचा सपाटा लावला. भारतीय गोलंदाजांनी उत्तम मारा करताना ऑस्ट्रेलियाच्या धावगतीवर चाप लगावला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
03:59 PM
पीटर हँड्सकोम्बने 55 चेंडूत चार चौकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केले
03:54 PM
ख्वाजापाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलही माघारी
03:42 PM
उस्मान ख्वाजाचे मालिकेतील दुसरे शतक
उस्मान ख्वाजाने पाच सामन्यांच्या मालिकेत दुसरे शतक झळकावले. कोटला वन डे सामन्यात त्याने 102 चेंडूंत 2 षटकार व 10 चौकार खेचून 100 धावा केल्या.
03:16 PM
ऑस्ट्रेलियाच्या 25 षटकांत 1 बाद 135 धावा.
अॅरोन फिंच माघारी परतल्यानंतर उस्मान ख्वाजानं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पीटर हँड्सकोम्बची त्याला उत्तम साथ लाभली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाचा धावफलक हलता ठेवला,
03:12 PM
उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकोम्ब यांची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
02:46 PM
उस्मान ख्वाजाने 49 चेंडूंचा सामना करताना अर्धशतक झळकावले. त्याने या खेळीत 1 षटकार व 6 चौकार लगावले
02:37 PM
भारतीय वन डे संघात कमबॅक करणाऱ्या रवींद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले.
02:17 PM
ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 षटकांत एकही गडी न गमावता 52 धावा केल्या. या मालिकेत तिसऱ्यांदा भारतीय संघाला पहिल्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट घेता आलेली नाही.
02:13 PM
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांची सकारात्मक सुरुवात, उस्मान ख्वाजा व अॅरोन फिंच यांची अर्धशतकी भागीदारी, 9 षटकांत 52 धावा
01:50 PM
चौथा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे जेतेपदाच्या चषकासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
01:43 PM
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान खवाजा आणि अरोन फिंच सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.
Web Title: India vs Australia 5th ODI : ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली, 35 धावांनी विजय
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.