युवराज सिंग, हर्षल गिब्स व किरॉन पोलार्ड या स्फोटक फलंदाजांनी एका षटकात सहा षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. एका षटकात जास्तीत जास्त ३६ धावा कुटल्या जाऊ शकतात, पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं अविश्वसनीय कामगिरी करताना युवी, गिब्स यांच्या विक्रमालाही मागे टाकले. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम हॅरिसन ( sam harrison ) यानं सोरेंटो डनक्रेग सीनियर क्लबकडून खेळताना नॅथन बेनेटच्या एका षटकात ५० धावा कुटल्या.
बेनेटच्या एका षटकात हॅरिसननं ८ षटकार खेचले, त्यानं या षटकात दोन नो बॉल टाकले आणि त्यावरही हॅरिसननं चेंडू सीमापार पाठवला. नॉर्थ सबर्बन कम्युनिटी क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेतील किंग्स्ली-वूडव्हेल सीनियर क्लबविरुद्धच्या सामन्यात ३९व्या षटकात हा चमत्कार घडला. ( Sorrento Duncraig Senior Club and Kingsley-Woodvale Senior Club in the North Suburban Community Cricket Association) . ३९व्या षटकात हॅरिसननं अर्धशतक पूर्ण केलं अन् ४०व्या षटकात त्याचे शतकही पूर्ण झालं होतं. हॅरिसननं ३९ व्या षटकात ८ षटकार खेचून ८० धावांवर पोहोचला अन् पुढील षटकात त्यानं २२ धावा केल्या. सोरेंटो संघानं ४० षटकांत २७६ धावा केल्या.
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू बर्ट व्हेंस यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९९०साली एका षटकात ७७ धावा दिल्या होत्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे सर्वात महागडे षटक आहे. या षटकात व्हेंसनं अनेक नो बॉल टाकले. त्याला सलग पाच षटकार बसले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनच फलंदाजांना एका षटकात सहा षटकार खेचता आले आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराजनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचले होते. हर्षल गिब्सनंही २००७मध्ये नेदरलँड्सविरुद्ध, तर किरॉन पोलार्डनं श्रीलंकेविरुद्ध असा पराक्रम केला आहे.
Web Title: Australian Batter Smashes 8 Sixes In An Over In Grade Cricket; Poor Bowler Ends Up With A 50-Run Over To His Name
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.