ऑसी फलंदाजाचे चौकारांच्या मदतीनं शतक, पण श्रीलंकेच्या कर्णधारानं घडवला विक्रम

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार बेथ मूनीनं रविवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:21 PM2019-09-30T13:21:52+5:302019-09-30T13:24:35+5:30

whatsapp join usJoin us
Australian Beth Mooney, who becomes only the fourth player to get two hundreds in women's T20Is | ऑसी फलंदाजाचे चौकारांच्या मदतीनं शतक, पण श्रीलंकेच्या कर्णधारानं घडवला विक्रम

ऑसी फलंदाजाचे चौकारांच्या मदतीनं शतक, पण श्रीलंकेच्या कर्णधारानं घडवला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार बेथ मूनीनं रविवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तिनं 20 चौकारांच्या मदतीनं शतकी खेळी करताना नवा विक्रम नावावर केला. यापूर्वी 2017मध्ये तिनं इंग्लंडविरुद्ध 19 चौकार ठोकले होते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बेथ मुनीनं 61 चेंडूंत 113 धावा करताना ऑस्ट्रेलियाला 4 बाद 217 धावांचा डोंगर उभारून दिला. 

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. पहिल्या स्थानावर इंग्लंड ( 3 बाद 226 धावा ) आघाडीवर आहेत. मुनीला एलिसा हिली ( 43) आणि एश गार्डनर ( 49) यांनी उत्तम साथ दिली. मुनीनं तिच्या खेळीत 20 चौकार लगावले. त्यात एकही षटकाराचा समावेश नाही. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ( पुरुष व महिला) एकही षटकार न खेचता शतक झळकावणारी मुनी पहिली खेळाडू ठरली आहे.


 
प्रत्युत्तरात श्रीलंकेला 7 बाद 176 धावाच करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने 41 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूनं 113 धावांची वादळी खेळी केली.  तिनं 66 चेंडूंत 12 चौकार व 6 षटकारांसह ही खेळी केली. श्रीलंकेकडून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिलीच खेळाडू आहे. शिवाय धावांचा पाठलाग करताना शतक करणारी पहिली महिला कर्णधार आहे.


विराटच काय, जे कुणालाच जमलं नाही ते नेपाळच्या कर्णधारानं करून दाखवलं
पुरुषांमध्ये हा विक्रम नेपाळच्या  पारस खडकाच्या नावावर आहे.  नेपाळ आणि सिंगापूर यांच्यात झालेल्या सामन्यात यजमानांनी प्रथम फलंदाजी केली. कर्णधार टी डेव्हिडने ४४ चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ६४ धावा केल्या. त्याला एस चंद्रमोहन (३५) आणि जनक प्रकाश (२५) यांनी उत्तम साथ दिली. सिंगापूरने २० षटकांत ३ बाद १५१ धावा केल्या. नेपाळच्या करण केसीने २ विकेट्स घेतल्या.  

प्रत्युत्तरात नेपाळने १६ षटकांत १ विकेट गमावत हे लक्ष्य पार केले. पारस आणि आरीफ शेख यांनी तुफान फटकेबाजी केली. आरीफने ३८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. पारसने ५२ चेंडूत ७ चौकार आणि ९ खणखणीत षटकार खेचत नाबाद १०६ धावा केल्या. नेपाळकडून ट्वेंटी-२०त शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. शिवाय धावांचा पाठलाग करताना ट्वेंटी-२०त शतक करणाऱ्या पहिल्या कर्णधाराचा मानही त्याने पटकावला. 

Web Title: Australian Beth Mooney, who becomes only the fourth player to get two hundreds in women's T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.