Join us  

युवा गोलंदाजानं ६ चेंडूत घेतले ६ विकेट्स; अखेरच्या ओव्हरमध्ये पूर्ण खेळच पालटला

२०१७ मध्ये एलैड कैरीने क्लब क्रिकेटमध्ये ६ विकेट्स घेतल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 4:56 PM

Open in App

क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथं क्षणोक्षणी उत्कंठा शिगेला पोहचलेली असते. या खेळात काही भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. एका चेंडूत विकेटही पडते आणि त्याच चेंडूत सिक्सरही मारला जातो. ऑस्ट्रेलियातील एका युवा गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये ६ विकेट्स घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे. विरोधी टीमला अखेरच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी ५ रन्सची गरज होती आणि त्यांच्या ६ विकेट्स शिल्लक होत्या. परंतु एका गोलंदाजानं अखेरच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या ६ विकेट्सनं हरलेली बाजीही पलटली.

या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे नाव गेराथ मोर्गन आहे. या गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया क्लब क्रिकेटमध्ये ही कमाल केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या थर्ड डिविजन क्लब क्रिकेटमध्ये गेराथ मोर्गननं त्याच्या एका ओव्हरमध्ये सलग ६ विकेट्स घेत फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. क्लब क्रिकेटच्या इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलं आहे जेव्हा गोलंदाजाने एका ओव्हरला ६ विकेट्स घेतल्या आहेत. याआधीही असा कारनामा क्लब क्रिकेटमध्ये झाला होता. तोदेखील ऑस्ट्रेलियामध्येच घडला होता. २०१७ मध्ये एलैड कैरीने क्लब क्रिकेटमध्ये ६ विकेट्स घेतल्या होत्या.

४० ओव्हरच्या मॅचमध्ये गेराथ मोर्गन हा मुदगीराबा क्लब क्रिकेटकडून खेळताना सरफर्स पैराडाइज क्लबच्या ६ फलंदाजांना एका ओव्हरमध्ये माघारी पाठवले. ४० व्या ओव्हरमध्ये सरफर्सला जिंकण्यासाठी अवघ्या ५ रन्सची गरज होती. मुदगीराबा क्लबच्या कॅप्टन मोर्गनने या ओव्हरच्या पहिल्या चेंडूत जेक गेराल्डची विकेट घेतली. इथान वेल्सनं त्याचा कॅच पकडला. दुसऱ्या चेंडूत कोनोर मॅथसनला कॅचआऊट केले. तिसऱ्या चेंडूत माइकल कुर्तिन इशानची विकेट घेतली. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूतही गेराथनं विकेट्स घेतली, त्यामुळे मुदगीरबा क्रिकेट संघ ५ रन्सने विजयी झाला.