मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जेमी मिशेन यांनी केलेल्या एका आरोपामुळे खळबळ उडाली आहे. १९८५ मध्ये श्रीलंका आणि भारताच्या दौऱ्यादरम्यान संघातील अधिकाऱ्यांनी त्यांचे लैंगिक शोषण केले होते. आता ५५ वर्षांचे झालेल्या मिशेल यांनी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, संघातील एका डॉक्टरने दुखापतीवर इलाज करताना त्यांचे लैंगिक शोषण केले होते. ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी आरोपांचा तपास सुरू केला आहे. तसेच आपण तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले.
जेमी मिशेल याने संघाचा एक फोटो ऑनलाईन पाहिल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे उत्तर मागण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी या प्रकरणाची माहिती सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करणाऱ्या विभागाकडे दिली होती. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. एबीसीच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मिशेल यांनी यांसिगले की, अखेरीस १९८५ मधील त्या दौऱ्याचा तपास होत असल्याने मला काहीसा दिलासा मिळाला आहे. तो दौरा माझ्या क्रिकेटच्या जीवनातील आकर्षण ठरण्याऐवजी त्याने मला अनेक वर्षे तणाव आणि यातना दिल्या.
मिशेल यांनी यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ६ प्रश्नांची यादी सोपवली आहे. त्यामध्ये त्यांनी विचारले की, या दौऱ्याचा रिपोर्ट आणि परीक्षण कुठे आहे. त्यांच्या मेडिकल रेकॉर्डचे काय झाले. रिपोर्टनुसार कोलंबोमध्ये ३० मार्च रोजी रात्री मिशेल यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर ते टीमच्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन दिले. त्यानंतर मिशेल हे सुमारे १० तास अचेतावस्थेत पडून होते.