Australian fans abuse Virat Kohli, video viral : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर भारताचे १६४ धावांत ५ गडी बाद केले. स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकाच्या (१४०) जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावांपर्यंत मजल मारली. याला प्रत्युत्तर देताना भारताची वरची फळी अडखळली. केवळ यशस्वी जैस्वाल चांगल्या लयीत खेळताना दिसला. पण विराट कोहलीसोबत मैदानावर झालेल्या गोंधळामुळे जैस्वाल ८२ धावांवर रनआउट झाला. या विकेटवरून सोशल मीडियावर कोहलीवर टीका करण्यात आली. पण ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी विराटला भरस्टेडियममध्येच शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर त्याला एक विशिष्ट शब्द वापरून त्याची खिल्ली उडवली.
'तो' शब्द कोणता? त्याचा अर्थ काय?
विराट आणि जैस्वाल यांच्यात चांगली भागीदारी होत होती. पण त्याचदरम्यान कोहलीने थोडासा गोंधळ घातला. सुरुवातीला कोहली धावला पण अचानक त्याने चेंडू पाहिला आणि न धावण्याचा निर्णय घेतला. या गोंधळात जैस्वाल धावत पुढे आला होता. त्यामुळे त्याला धावबाद व्हावे लागले. या घटनेनंतर मेलबर्नच्या चाहत्यांच्या एका गटाने विराट कोहलीची खिल्ली उडवली. Kohli is a wanker (कोहली इज ए वँकर) असं म्हणत चाहत्यांनी त्याला चिडवले.
कोहलीची खिल्ली उडवणारे प्रेक्षक-
वँकर या शब्दांचे विविध अर्थ होतात. त्यापैकी एक अर्थ हा फारच अश्लील आहे. तर एक अर्थ म्हणजे अशी व्यक्ती ज्याचा अजिबात आदर करू नये.
दरम्यान, विराट कोहली सध्या विचित्र गोष्टींमुळेच चर्चेत येताना दिसतोय. विराट कोहलीच्या बॅटिंग चा फॉर्म ही त्याच्यासाठी चिंतेची बाब असताना आधी ऑस्ट्रेलियन मीडियाशी त्याचा विमानतळावर वाद झाला त्याच्या परवानगी शिवाय मुलांचे फोटो काढल्याचा आरोप करत कोहली एका महिला पत्रकाराची वाद घालताना दिसला या प्रकरणा नंतर चौथ्या कसोटीत कोहलीने पदार्पण वीर सेम कॉन्स्टास याला धक्का मारला त्यामुळे कोहलीला सामन्याच्या मानधनांपैकी 20 टक्के रक्कम दंड थोठवण्यात आला. या प्रकरणातून बाहेर पडण्याआधी आज यशस्वी जयस्वाल चांगल्या लयीत असताना कोहली बरोबर झालेल्या गोंधळामुळे तो बाद झाला त्यामुळे पुन्हा एकदा विराटला अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले.