Join us  

स्टार्क २४.७५ कोटींना विकला; IPLच्या इतिहासातील महागड्या खेळाडूंच्या यादीत कोण?, पाहा

IPL Auction 2024 :आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

By मुकेश चव्हाण | Published: December 19, 2023 4:33 PM

Open in App

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL)२०२४ साठी खेळाडूंचा लिलाव आज दुबईमध्ये सुरु आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरणार असं वाटत होतं. पण त्याचा हा विक्रम त्याच्याच सहकाऱ्याने तासाभरात मोडला. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.   

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू 

१. मिचेल स्टार्क (२४.७५ कोटी रुपये): कमिन्सचा हा विक्रम वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोडला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.

२. पॅट कमिन्स (२०.५० कोटी रुपये): पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 

३. सॅम करन (१८.५० कोटी रुपये): इंग्लंडचा स्टार अष्टपैलू सॅम कुरन हा आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०२३च्या लिलावात करणने इतिहास रचला होता. या वेगवान अष्टपैलू खेळाडूला पंजाब किंग्ज (PBKS) फ्रँचायझीने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले. कुरन सध्या पंजाब किंग्जचा भाग आहे.

४. कॅमेरॉन ग्रीन (१७.५० कोटी रुपये): सॅम कुरननंतर, कॅमेरॉन ग्रीन हा लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्सने (MI) १७.५० कोटींची बोली लावून विकत घेतले. ग्रीन आगामी आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळताना दिसणार आहे. लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने ग्रीनचा व्यवहार केला होता.

५. बेन स्टोक्स (१६.२५ कोटी रुपये): इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL २०२३च्या लिलावात १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. स्टोक्सने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आगामी आयपीएल हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

६. ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी रुपये): दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएल लिलावात विकला गेलेला चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०२१च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (RR) मॉरिसला १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर मॉरिसने या प्रकरणात युवराज सिंगला मागे टाकले होते. युवराजला २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने १६ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

७. निकोलस पूरन (१६ कोटी रुपये): कॅरेबियन क्रिकेटर निकोलस पूरन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मागील आयपीएल लिलावात पूरणला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) १६ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. पूरण पुढील आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये युवी आघाडीवर-

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने १६ कोटींना विकत घेतले. मात्र, २०१५च्या मोसमात युवराज काही विशेष करू शकला नाही. त्याला १४ सामन्यांत १९च्या सरासरीने केवळ २४८ धावा करता आल्या. पुढील हंगामापूर्वी युवराजला फ्रँचायझीने सोडले होते. 

सर्वात महाग विकले जाणारे भारतीय खेळाडू-युवराज सिंग (१६ कोटी)इशान किशन (१५.२५ कोटी)गौतम गंभीर (१४.९० कोटी)दीपक चहर (१४ कोटी)दिनेश कार्तिक (१२.५० कोटी)

टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलावबीसीसीआय