भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मॅक्सवेल, मार्शची फ्रॅंचायझी लीग मधून माघार

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:32 PM2023-07-05T19:32:57+5:302023-07-05T19:33:22+5:30

whatsapp join usJoin us
Australian players Mitchell Marsh and Glenn Maxwell have pulled out of The Hundred to avoid workload in the ODI World Cup in India  | भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मॅक्सवेल, मार्शची फ्रॅंचायझी लीग मधून माघार

भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मॅक्सवेल, मार्शची फ्रॅंचायझी लीग मधून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Glenn Maxwell & Mitchel Marsh : सध्या इंग्लंडच्या धरतीवर शेस मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली आहे. खरं तर आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. शेस मालिका खेळण्यात व्यग्र असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे खेळाडूंना वर्क लोडचा सामना करावा लागू नये म्हणून ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांना द हंड्रेडमधून माघारी घेण्यास बोर्डाने सांगितले आहे. म्हणजेच द हंड्रेडमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श खेळणार नाहीत.

ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मिचेल मार्श द हंड्रेडमधील लंडन स्पिरिट संघाचा भाग आहेत. लंडन स्पिरिटने मॅक्सवेल आणि मार्शला १.३१ कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला असून दोन्ही खेळाडू फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळणार नाहीत.

विश्वचषकाच्या दृष्टीने पावले
आयसीसी वन डे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. हे पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या दोन्ही खेळाडूंना कामाचा ताण कमी करण्यास सांगितले. दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या प्रस्तावाला होकार दिला असून त्यांनी फ्रँचायझी लीगमधून माघार घेतली आहे.

५ ऑक्टोबरपासून थरार 
 आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Australian players Mitchell Marsh and Glenn Maxwell have pulled out of The Hundred to avoid workload in the ODI World Cup in India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.