IND vs AUS: "भारतात जिंकणे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे", मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची प्रतिक्रिया

ind vs aus test squad: 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:08 PM2023-02-06T14:08:25+5:302023-02-06T14:09:09+5:30

whatsapp join usJoin us
Australian players Steve Smith, Pat Cummins, David Warner and Mitchell Starc have made big statements ahead of the ind vs aus first test  | IND vs AUS: "भारतात जिंकणे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे", मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची प्रतिक्रिया

IND vs AUS: "भारतात जिंकणे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे", मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ind vs aus test । नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. आगामी कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. अशा स्थितीत दोन्ही संघासमोर कडवे आव्हान असणार आहे. 

दरम्यान, आगामी मालिकेसाठी भारतीय संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले आहे. खरं तर पाहुणा कांगारूचा संघ भारतीय फिरकी गोलंदाजांविरूद्ध अतिरिक्त सराव करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. अश्विन-जडेजाच्या फिरकीपासून वाचण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अतिरिक्त सरावाला प्राधान्य दिले आहे. अशातच संघातील आघाडीच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्याच्या आधी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच पहिल्या सामन्यातून माघार घेतलेल्या मिचेल स्टार्कने एक मोठे विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पहिल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मोठी विधाने - 
भारतात मालिका जिंकणे शेसपेक्षा मोठे आहे - स्टीव्ह स्मिथ 
ही मालिका शेस जिंकण्यासारखे आहे, करिअर निश्चित करणारा क्षण - पॅट कमिन्स 
भारताला हरवणे हे सर्वात कठीण आव्हान आहे - डेव्हिड वॉर्नर 
भारतात जिंकणे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे - मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव. 

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - 
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन. 

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
  2. 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
  3. 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
  4. 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

  1. 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
  2. 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
  3. 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    


 

Web Title: Australian players Steve Smith, Pat Cummins, David Warner and Mitchell Starc have made big statements ahead of the ind vs aus first test 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.