Join us  

T20 WCच्या ऐवजी होणार IPL2020; बीसीसीआयसाठी मोठी बातमी 

आयसीसी लवकरच घोषणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 5:42 PM

Open in App
ठळक मुद्दे18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धेचे नियोजनट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) खेळवण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) मार्ग मोकळा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) केलेल्या घोषणेनुसार 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा होणार होती. पण, कोरोना व्हायरसमुळे आता ती स्थगित होण्याच्या मार्गावर आहे.  

''वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित केल्याची घोषणा या आठवड्यात होऊ शकते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे,''असे वृत्त 'The Daily Telegraph' ने दिले आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी इंग्लंड दौरा डोळ्यासमोर ठेवून वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेटच्या तयारीला सुरुवात करतील. The Daily Telegraph मध्ये लिहिले आहे की,''सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सरावाला सुरुवात करतील. त्यानंतर अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली संघ लंडनला रवाना होईल.''

आयपीएलचा मार्ग मोकळातसे झाल्यास आयपीएलचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे आता आयपीएल स्पर्धा नेमकी कुठे खेळवायची हा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. श्रीलंका, संयुक्त अऱब अमिरातीनंतर आता न्यूझीलंडनेही आयपीएल आयोजनासाठी प्रस्ताव ठेवला आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी

बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'

सचिन तेंडुलकर ओपनिंगला नॉन स्ट्राइकवर का रहायचा? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण

विनोद राय यांचा खुलासा; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड होता पहिली पसंती, पण...

WWE सुपरस्टारनं हद्दच केली; Romantic पोस्टसाठी पत्नीसोबत काढला विवस्त्र सेल्फी!

माझी सगळी पदकं तुमची, तुमच्यापुढे मी कुणीच नाही; ऑलिम्पिकमधील 'गोल्डन गर्ल'चा डॉक्टरांना सलाम

टॅग्स :आयपीएल 2020आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020