चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेलीने वॉर्नरच्या पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. वॉर्नर जरी इच्छुक असला तरी त्याचा पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार केला जाणार नाही असे बेलीने स्पष्ट केले. खरे तर ३७ वर्षीय वॉर्नरने आगामी आयसीसी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधून ऑस्ट्रेलियन संघ बाहेर होताच वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. पण असे असतानाही त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जॉर्ज बेलीने वॉर्नरच्या निवडीबाबत सांगितले की, डेव्हिड वॉर्नर निवृत्त झाला आहे अशी आम्हाला माहिती आहे. त्याने तिनही फॉरमॅटमध्ये केलेल्या अविश्वसनीय कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. त्याची कारकीर्द अप्रतिम होती. पण, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही. दरम्यान, ८ जुलै रोजी वॉर्नरने सांगितले होते की, तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल. मात्र, एका आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने त्याच्या या आशेवर पाणी टाकले.
वॉर्नरने अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले.
वॉर्नरची कारकीर्द
कसोटी - सामने : ११२, सरासरी: ४४.५९ धावा : ८७८६, शतक/अर्धशतक : २६/३७.
एकदिवसीय - सामने : १६१, सरासरी: ४५.३०. धावा : ६९३२, शतक/अर्धशतक : २२/३३.
टी-२० - सामने : ११०, सरासरी: ३३.४३, धावा : ३,२७७, शतक/अर्धशतक : १/२८.
Web Title: Australian selectors confirmed david Warner won't be considered for Champions Trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.