Join us  

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दिलं कोहलीला चॅलेंज; विराट पूर्ण करणार...

गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना आता अव्वल स्थान खुणावते आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 2:53 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी सामना जिंकल्याचे सेलिब्रेशन करत असतानाच कर्णधार विराट कोहलीला एक चॅलेंज देण्यात आले आहे. हे चॅलेंज दिले आहे ते ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने.

भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली आहे. भारतीय संघ 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, परंतु ऑस्ट्रेलियानं रविवारी पाकिस्तानला नमवून या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना आता अव्वल स्थान खुणावते आहे. भारताच्या खात्यात सध्या ३६० गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ११६ गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने कोहलीला एक चॅलेंज दिले आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये येऊन दिवस रात्र कसोटी सामना खेळावा, असे पेनने म्हटले आहे.

पेन म्हणाला की, " ऑस्ट्रेलियामध्ये गावस्कर-बोर्डर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ब्रिस्बेनपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेत भारताने एक दिवस रात्र कसोटी सामना खेळावा, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही त्यांना विनंती करणारर आहोत." 

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बदल करण्यासाठी कोहलीने दिला सल्ला; आयसीसी काय करणार...मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली आहे. भारतीय संघ 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पण तरीदेखील या स्पर्धेत काही बदल करण्याचा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिला आहे. आता त्याचा हा सल्ला आयसीसी ऐकणार का, हे सर्वात महत्वाचे आहे.

कोहली म्हणाला की, " आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत काही बदल करायला हवे, असे मला वाटते. जर एखाद्या संघाबरोबर आम्ही आमच्या देशात कसोटी मालिका खेळलो तर त्यांच्या देशामध्येही मालिका खेळवली जायला हवी. कारण आम्ही आतापर्यंत फक्त दोन वेळा भारताबाहेर खेळलो आहोत." 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतआॅस्ट्रेलिया