Join us  

Nathan Lyon:ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने केले दुसरे लग्न; बायकोला सोडून गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार 

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथल लायन दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:15 PM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथल लायन (Nathan Lyon) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. रविवारी २० जुलै रोजी त्याने गर्लफ्रेंड एम्मा मॅकार्टीसोबत (Emma McCarthy) लग्न केले असून याची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली. मागील पाच वर्षांपासून हे कपल एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे नॅथन लायनने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून गर्लफ्रेंड सोबत लग्न केल्याने एकच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या पहिल्या बायकोने त्याला गर्लफ्रेंड सोबत पकडले होते. मात्र आता त्याने दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. 

दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षावदरम्यान, वयाच्या ३४ व्या वर्षी नॅथन लायन दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. लग्नाचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मिस्टर आणि मिसेस'. ऑस्ट्रेलियाच्या काही आजी माजी खेळाडूंनी या नवजोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शॉन बॉट, पीटर सिडल, मॅट रेनशॉ, मिचेल स्वेप्सन, माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली, लेक्स कॅरी, जोश इंग्लिस आणि ख्रिस ग्रीन अशा दिग्गजांचा समावेश आहे. 

नॅथन २०१७ मध्ये त्याची पहिली पत्नी मेलिसा वॉरिंगपासून (Melissa Warring) वेगळा झाला होता. पहिली पत्नी मेलिसा आणि नॅथन यांना दोन मुली आहेत, ज्या सध्या त्यांच्या आईसोबत राहतात. एम्मा ही एक रिअल इस्टेट एजंट आहे. ती काही वर्षांपासून नॅथनला डेट करत आहे आणि अनेकदा त्याला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इव्हेंटमध्ये दिसली आहे. 

सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नॅथन लायन नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. या मालिकेत प्रभात जयसूर्या नंतर सर्वाधिक बळी पटकावणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता. लायनने आतापर्यंत एकूण ११० कसोटी सामने खेळले असून ४३८ बळी पटकावले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत नॅथन तिसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न ७०८ बळींसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे तर ग्लेन मॅकग्रा ५६३ बळींसह दुसऱ्या स्थानावर स्थित आहे. 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियालग्नइन्स्टाग्रामशेन वॉर्न
Open in App