मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांतील युद्ध अजून मैदानात रंगले नसले तरी मैदानाबाहेरील शाब्दिक हल्ले मात्र सुरु झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने या शाब्दिक हल्ल्यांना सुरुवात केली आहे. भारताच्या हार्दिक पंड्यापेक्षा ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेटपटू लय भारी असल्याचे हेडनने सांगितले आहे.
भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाकडे केवळ सात सामने आहेत. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.
हेडन म्हणाला की, " पंड्यापेक्षा ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉइनिस हा दर्जेदार क्रिकेटपटू आहे. पण त्याला ऑस्ट्रेलियाकडून जास्त संधी मिळालेली नाही. पण जर त्याला जास्त संधी दिली तर तो पंड्यापेक्षा चांगली कामगिरी नक्कीच करून दाखवू शकतो. पंड्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तो एक चांगला अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. पण त्याला भरपूर संधी भारताने दिल्या आहेत. दुसरीकडे स्टोइनसला जास्त संधी मिळालेली नाही. जर ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करायची असेल तर त्याला जास्तीत जास्त संधी द्यायला हव्यात. पंड्या हा चांगला अष्टपैलू क्रिकेटपटू नाही, असे माझे नक्कीच म्हणणे नाही. पण पंड्यापेक्षा ऑस्ट्रेलिया हा नक्कीच उजवा आहे. "
भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभूत केले होते. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतूर आहे. आता तर ऑस्ट्रेलियाच्या संघा भारताचाच एक फिरकीपटू मदत करणार असल्याचे समोर आले आहे. भारतीय खेळपट्टीही फिरकीला पोषक असते. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाकडे चांगला फिरकीपटू नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूला भारतामध्ये जास्त यश मिळाल्याचेही पाहायला मिळालेले नाही. पण भारतीय खेळाडूंना मायदेशातील प्रत्येक खेळपट्टीचा पोत माहिती असतो.