Join us  

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे सामने अ‍ॅडिलेडमध्ये खेळवा-हेजलवूड

आर्थिकदृष्ट्या कमुकवत झालेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कुठल्याही स्थितीत भारताविरुद्धची कसोटी मालिका आयोजित करायची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 1:03 AM

Open in App

मेलबोर्न : भारताविरुद्ध कसोटी मालिका आयोजित करण्याच्या सर्व पर्यायांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मंथन सुरू असतानाच त्यांचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने गावस्कर-बॉर्ड चषक मालिकेतील सर्वच सामने अ‍ॅडिलेड ओव्हल या एकच मैदानावर आयोजित करण्याची सूचना केली आहे.कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या कमुकवत झालेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कुठल्याही स्थितीत भारताविरुद्धची कसोटी मालिका आयोजित करायची आहे. यातून मोठा महसूल उभा होणार असल्यामुळे सामन्यांसाठी सर्व पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.हेजलवूड याने ऑस्ट्रेलियातील मीडियाशी बोलताना भारताविरुद्ध कसोटी मालिका अ‍ॅडिलेडच्या एकाच मैदानावर झाल्यास गोलंदाज आणि फलंदाज आनंदी होतील, असे सांगितले. तो म्हणाला, ‘गेल्या पाच वर्षांतील हे सर्वेत्कृष्ट मैदान ठरले आहे. येथे गोलंदाज आणि फलंदाजांना सारखी संधी असते.’भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. टी-२० मालिका ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाआधी खेळली जाईल.लॉकडाऊनच्या काळात हेजलवूड हा गोल्फ आणि गेमिंगझोनमध्ये तसेच बागकामात व्यस्त आहे. हेजलवूडला आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करण्याची इच्छा होती. तथापि, आयोजन रद्द झाल्यामुळे टी-२० विश्वचषकाआधी कुठलाही सामना नसल्याने विश्वचषकाच्या संघात स्थान मिळेलच याची खात्री नसल्याचे हेजलवूडने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया