Australia’s New Captain : मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केला नवा कर्णधार; वॉर्नर, स्मिथ यांना डावलले

ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी घरच्या मैदानावर मैदानावर उतरणार आहे. काल झालेल्या सराव सामन्यात भारताकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:34 AM2022-10-18T10:34:57+5:302022-10-18T10:37:04+5:30

whatsapp join usJoin us
Australia’s New Captain : Pat Cummins named Australia’s ODI captain till 2023 ODI World CUP; David Warner, Steve Smith snubbed | Australia’s New Captain : मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केला नवा कर्णधार; वॉर्नर, स्मिथ यांना डावलले

Australia’s New Captain : मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केला नवा कर्णधार; वॉर्नर, स्मिथ यांना डावलले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी घरच्या मैदानावर मैदानावर उतरणार आहे. काल झालेल्या सराव सामन्यात भारताकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे आव्हान समोर असताना ऑस्ट्रेलियाने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची ( ODI World Cup 2023) तयारी सुरू केली आहे. मंगळवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वन डे संघाचा कर्णधार म्हणून जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) याची निवड केली आहे. अ‍ॅरोन फिंचने वन डे संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर डेव्हिड वॉर्नर किंवा स्टीव्ह स्मिथ यांची नावं चर्चेत होती. त्यासाठी वॉर्नरवरील कर्णधारपदाची बंदी हटवण्याच्याही हालचाली सुरू होत्या, पण आज अनपेक्षित निर्णय घेतला गेला.

India vs Pakistan सामन्यात कोण जिंकणार? Sachin Tendulkarची भविष्यवाणी, Semi Finalची चार संघही सांगितले

 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अ‍ॅरोन फिंच ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवित आहे, परंतु मागच्या महिन्यात त्याने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिायने डेव्हिड वॉर्नरवर चेंडू कुरतडण्या प्रकरणी कर्णधारपदाची बंदी घातली आहे. पण, फिंचच्या निवृत्तीनंतर वॉर्नरवरील बंदी हटवण्याचा विचार सुरू झाला होता. त्याच्यासह स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल व मिचेल मार्श यांचीही नावं वन डे संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत होती. मात्र, कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. तो ऑस्ट्रेलियाचा २७वा वन डे कर्णधार आणि पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी शेन वॉर्नने ११ वन डे सामन्यांत ऑसींची नेतृत्व सांभाळले होते.


कर्णधारपद जाहीर करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उप कर्णधार कोण असेल याची घोषणा केलेली नाही. कमिनन्सने ७३ वन डे सामन्यांत ११९ विकेट्स घेतल्या आहेत आणि ५-७० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मागच्यावर्षी अ‍ॅशेस मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम पेनची हकालपट्टी केली आणि कसोटी संघाची जबाबदारी कमिन्सकडे सोपवली. त्याच्या नेतृत्वाखाली ऑसींनी पाकिस्तानविरुद्धची मालिका १-० अशी जिंकली. कमिन्सकडे वन डे संघाचे नेतृत्व हे २०२३च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत असणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑसींची संघ नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Australia’s New Captain : Pat Cummins named Australia’s ODI captain till 2023 ODI World CUP; David Warner, Steve Smith snubbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.