मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवला. आता या पाराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघल उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी विजयासाठी त्यांनी खास रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने यावेळी याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाकडे केवळ सात सामने आहेत. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.
याबाबत फिंच म्हणाला की, " आम्हाला भारतामध्ये येऊन पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. भारताविरुद्धच्या सामन्यात पूर्ण आत्मविश्वाने उतरलो तर विजय आमचाच असेल. त्याचबरोबर आम्ही या दौऱ्यासाठी खास रणनीती आखली आहे. या रणनीतीची योग्य अंमलबजावणी झाली तर भारताचा पराभव निश्चित होऊ शकतो. "
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचे या सामन्यात कमबॅक झाले आहे. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) पहिल्या दोन वन डे आणि उर्वरित वन डे सामन्यांसाठी वेगळे संघ जाहीर केले आहेत. ट्वेंटी- 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. दिनेश कार्तिकला वन डे संघातून डच्चू देण्यात आला आहे.
कोहलीचा ट्वेंटी-20 व वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासह जसप्रीत बुमराचाही 15 सदस्यीय संघांत समावेश करण्यात आला आहे. बुमरालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील.
Web Title: Australia's new strategy to defeat India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.