ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर विजयासाठी 243 धावांचे लक्ष्य

सलामीवीर वॉर्नर व अॅरॉन फिंच यांच्या 66 धावांच्या अर्धशतकी खेळीनं सुरुवातीला ऑस्ट्रेलियानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 05:06 PM2017-10-01T17:06:34+5:302017-10-01T18:13:07+5:30

whatsapp join usJoin us
Australia's target of 243 runs against Australia | ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर विजयासाठी 243 धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर विजयासाठी 243 धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर - सलामीवीर वॉर्नर व अॅरॉन फिंच यांच्या 66 धावांच्या अर्धशतकी खेळीनं सुरुवातीला ऑस्ट्रेलियानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना माघारी धाडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव काहीसा गडगडला. पटेलनं पांडेकरवी वॉर्नरला झेलबाद केलं. त्यानंतर पांड्यानंही फिंचचा बळी मिळवला. सलामीवीर अॅरॉन फिंचची (32) विकेट काढत भारताने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंच बाद झाल्यावर स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर माघारी परतले. त्यानंतर मैदानावर आलेला हँड्सकॉम्बही 13 धावा काढून तंबूत परतला. तर ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड 42 धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरनं 62 चेंडूंत 5 चौकारांसह 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धडाधड बळी टाकायला सुरुवात केली. त्यात भारताकडून पटेल आणि बुमराहनं सर्वाधिक बळी मिळवले. पटेलनं वॉर्नर, हँड्सकॉम्ब, हेड यांना माघारी धाडलं, तर बुमराहनं वेड आणि स्टोइनिसला मैदानावरून घरी पाठवलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टोइनिस व हेडनं 87 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर मैदानावर आलेल्या मार्कस स्टोइनिस व मॅथ्यू वेड बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर भारतानं त्यांच्या धावसंख्येला लगाम घातला. भारतीय गोलंदाजांनी वेगवान गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 242 धावांवरच रोखले. भारतानं आतापर्यंत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1नं आघाडी घेतली आहे. भारतीय संघ विजय मिळवण्याच्या दृष्टीनं खेळतोय.

Web Title: Australia's target of 243 runs against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.