ठळक मुद्देपहिल्या दिवशी शतक झळकावलेल्या पुजारानं दुसऱ्या दिवशीही शानदार खेळी केली.सौराष्ट्रच्या या फलंदाजानं 150 धावा पूर्ण करून स्वतःच्या नावे नवा विक्रम केला आहे.पुजारा हा सिडनी क्रिकेट मैदानावर 150हून जास्त धावा केलेला पाचवा भारतीय खेळाडू
सिडनी- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. पहिल्या दिवशी शतक झळकावलेल्या पुजारानं दुसऱ्या दिवशीही शानदार खेळी केली. सौराष्ट्रच्या या फलंदाजानं 150 धावा पूर्ण करून स्वतःच्या नावे नवा विक्रम केला आहे. खरं तर 150 धावा पूर्ण करून पुजारा आता पाचवा असा फलंदाज ठरला आहे की, ज्यानं सिडनी क्रिकेट मैदानावर 150हून जास्त धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर(241, 154), रवी शास्त्री(206), व्हीव्हीएस लक्ष्मण(178, 167), सुनील गावस्कर(172), तर पुजारा(193)ही या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
पुजारा ऑस्ट्रेलियाविरोधात मालिकेत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत कोहली पहिल्या स्थानी, तर सुनील गावस्कर दुसऱ्या स्थानी आहेत. या मालिकेत पुजारा ऑस्ट्रेलियाविरोधात एखाद्या सराव सामन्यादरम्यान पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा बनवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
तसेच यादीत वीरेंद्र सहवाग सर्वात वरच्या स्थानी आहेत. पुजारा एका मालिकेत ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या फलंदाजांमध्ये राहुल द्रविड, सुनील गावस्कर, विजय हजारे आणि कोहलीच्या बरोबरीत आहे. त्यानं मालिकेत आतापर्यंत 1135 चेंडूंचा सामना केला आहे. पुजारानं या आधाही मेलबर्न सीरिजमधल्या तिसऱ्या सराव सामन्यात जबरदस्त शतक झळकावलं होतं.
Web Title: ausvind cheteshwar pujara slams 150 runs and earned a another record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.