पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीचे सत्र तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही कायम राहिले. केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क आणि सीन अबॉट यांच्या भेदक माऱ्यानं पाकिस्तानच्या फलंदाजाला हतबल केलं. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा इफ्तिखर अहमदने चिवट खेळ करताना संघाला शंभरी पार पल्ला गाठून दिला. पाकिस्तानला निर्धारित 20 षटकांत केवळ 8 बाद 106 धावाच करता आल्या. फलंदाजीच्या अपयशानंतर क्षेत्ररक्षणातही पाक खेळाडू गचाळ कामगिरी पाहायला मिळाली.
पहिली ट्वेंटी-20 पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या ट्वेंटी-20त ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला. पाकिस्तानच्या 6 बाद 150 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं दमदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं 7 विकेटनं हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 51 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 80 धावा केल्या होत्या.
आजच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान प्रथम फंलदाजीला आला. बाबर आझम ( 6), मोहम्मद रिझवान ( 0) या दोघांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवून मिचेल स्टार्कनं पाकला मोठा धक्का दिला. त्यानंतर अबॉट व रिचर्डसन यांनी पाकच्या अन्य फलंदाजांना गुंडाळलं. इफ्तिखरने 37 चेंडूंत 45 धावांची संयमी खेळी करताना संघाला 106 धावांपर्यंत मजल मारून दिली. रिचर्डसननं 18 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
पाहा व्हिडीओ...