IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

IPL AUCTION 2024 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पुढील महिन्यात लिलाव प्रकिया पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 06:09 PM2023-11-22T18:09:35+5:302023-11-22T18:10:08+5:30

whatsapp join usJoin us
Avesh Khan traded to Rajasthan Royals and Devdutt Padikkal traded to Lucknow Super Giants ahead of ipl 2024 auction   | IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Avesh Khan atraded with Devdutt Padikkal : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पुढील महिन्यात लिलाव प्रकिया पार पडणार आहे. लवकरच खेळाडूंना रिटेन केलेली आणि रिलीज केलेली यादी समोर येईल. अशातच लखनौ सुपर जायंट्सच्या गोटात खळबळ माजली. खरं तर लखनौने ट्रेडमधून खेळाडूंची अदलाबदली केली आहे. राजस्थान रॉयल्सनेलखनौ सुपर जायंट्सशी ट्रेड करून आवेश खानला आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला लखनौच्या संघात पाठवले. आयपीएलचा मागील हंगाम आवेश खानसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला.

आवेश खानने आतापर्यंत ४७ आयपीएल सामने खेळले असून त्याने ५५ बळी घेतले आहेत. २२ सामन्यांत लखनौच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना आवेशला काही खास कामगिरी करता आली नाही. लखनौच्या ताफ्यात सामील झाल्यापासून त्याला केवळ २६ बळी घेता आले. आयपीएल २०२२ च्या हंगामात आवेश खान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यानंतर चर्चेत आला होता. तेव्हा लखनौने निसटता विजय मिळवताच आवेशने हेल्मेट आपटून जोरदार सेलिब्रेशन केले होते. 

देवदत्त पडिक्कल त्याच्या वर्तमान मानधनातच राजस्थानच्या संघाकडून लखनौच्या ताफ्यात गेला आहे. डावखुऱ्या या फलंदाजाने ५७ आयपीएल सामने खेळले असून १ शतक आणि ९ अर्धशतकांच्या मदतीने १५२१ धावा केल्या आहेत. तो २०२२ मध्ये आरआरमध्ये सामील झाला आणि २८ सामन्यांमध्ये त्याने ६३७ धावा कुटल्या. 
 

Web Title: Avesh Khan traded to Rajasthan Royals and Devdutt Padikkal traded to Lucknow Super Giants ahead of ipl 2024 auction  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.