सिडनी : क्रिकेट हा पुरुषांचा खेळ आहे, असे अनेकदा बोलले जाते. त्यामुळे या खेळातील अनेक विक्रम हे पुरुष क्रिकेटपटूंच्याच नावावर असल्याचा इतिहास आहे. मात्र, बुधवारी या परंपरेला पुन्हा एकदा छेद देणारी घटना घडली. ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटपटूंनी बुधवारी स्थानिक क्रिकेट सामन्यांत 50 षटकांत तब्बल 3 बाद 596 धावा कुटल्या. विशेष म्हणजे या संघाने प्रतिस्पर्धींचा डाव 10.5 षटकांत 25 धावांत गुंडाळून 571 धावांनी विजयही मिळवला. एसएसीए पीसी स्टेटवाईड सुपर महिला क्रिकेट स्पर्धेतील नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट आणि पोर्ट अॅडलेड यांच्यातील हा सामना.
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाच्या टीगॅन मॅकफार्लीन, सॅम बेट्ट्स, टॅबिथा सॅव्हिल आणि डार्सिइ ब्राउन या चारही खेळाडूंनी शतकी खेळी साकारताला 12 च्या सरासरीने धावा चोपल्या. मॅकफार्लीनने 80 चेंडूंत 130, बेट्ट्सने 71 चेंडूंत नाबाद 124, सॅव्हिलने 56 चेंडूंत 120 आणि ब्राउनने 84 चेंडूंत नाबाद 117 धावा केल्या. या सामन्यात षटकारांची आतषबाजी झाली असेलच, परंतु 596 धावांच्या या आव्हानात केवळ तीनच षटकार लगावण्यात आले. त्याउलट 64 चौकार लगावले. पोर्ट अॅडलेड संघाने 88 अतिरिक्त धावा देत नॉर्दर्नच्या धावसंख्येत भर घातली.
आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा
न्यूझीलंड महिला वि. आयर्लंड ( 2018) : 4 बाद 490
इंग्लंड पुरुष वि. ऑस्ट्रेलिया ( 2018) : 6 बाद 481
न्यूझीलंड महिला वि. पाकिस्तान ( 1997) : 5 बाद 455
इंग्लंड पुरुष वि. पाकिस्तान ( 2016) : 3 बाद 444
श्रीलंका पुरुष वि. नेदरलँड्स ( 2006) : 9 बाद 443
प्रोफेशनल क्रिकेटमध्ये मॅपुमलंगा या संघाने जोहान्सबर्ग येथे 2010/11 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये केई संघाविरुद्ध 1 बाद 690 धावा केल्या होत्या.
Web Title: Awesome: Cricket team in Australia scores 596/3 in 50 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.