Ind vs WI:धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:18 PM2022-07-25T12:18:46+5:302022-07-25T12:19:37+5:30

whatsapp join usJoin us
Axar Patel has broken MS Dhoni's 17-year-old record by hitting 5 sixes against West Indies | Ind vs WI:धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास

Ind vs WI:धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Axar Patel Record | त्रिनिदाद : सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिल्या दोन्हीही सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने यजमान संघाला त्याच्याच धरतीवर चितपट केले आहे. दुसऱ्या सामन्यात विंडीजच्या घरच्या मैदानावर अक्षर पटेलने विक्रमी खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या हातून विजय निसटत चालला असतानाच अक्षरने फिनिशरची भूमिका निभावली आणि सर्वांना माजी कर्णधार धोनीची आठवण करून दिली. 

दरम्यान, ३१२ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करणे भारतीय संघासाठी एक मोठे आव्हान होते. कारण विंडीजच्या धरतीवर यापूर्वी एकदाच हा कारनामा करण्यात कोणत्या संघाला यश आले होते. मात्र अक्षर पटेलने ते आव्हान पेलले आणि धोनीच्या १७ वर्षांच्या विक्रमाला देखील मोडीत काढले. भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या १० षटकांमध्ये १०० आणि शेवटच्या ३ चेंडूमध्ये ६ धावांची आवश्यकता होती. 

धावांचा पाठलाग करताना ७ किंवा त्याहून खालील क्रमांकावर येऊन सर्वाधिक षटकार 

अक्षर पटेल - ५ षटकार विरूद्ध वेस्टइंडिज - २०२२
महेंद्रसिंग धोनी - ३ षटकार विरूद्ध झिम्बाब्वे - २००५
युसूफ पठाण - ३ षटकार विरूद्ध दक्षिण आफ्रिका - २०११
युसूफ पठाण - ३ षटकार विरूद्ध आयर्लंड - २०११

३५ चेंडूत ठोकल्या ६४ धावा 
वेस्टइंडिजविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आक्रमक खेळी करून अक्षर पटेलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. आयपीएलमध्ये आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या अक्षरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावता आले नव्हते. मात्र संघाला गरज असताना आक्रमक खेळी केल्याने तो विजयाचा हिरो ठरला. निम्मा भारतीय संघ केवळ २०५ धावांवर तंबूत परतला होता. दीपक हुड्डा, शार्दुल ठाकूर आणि आवेश खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. परंतु अक्षरने एकतर्फी लढा देत ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६४ धावा करून भारताला २ गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. 

 

Web Title: Axar Patel has broken MS Dhoni's 17-year-old record by hitting 5 sixes against West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.