Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट 

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:42 AM2019-11-09T11:42:13+5:302019-11-09T11:42:38+5:30

whatsapp join usJoin us
Ayodhya Verdict :'Shri Ram Jai Ram Jai Jai Ram', Virender Sehwag takes to Twitter after Ayodhya verdict | Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट 

Ayodhya Verdict : अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकालावर वीरेंद्र सेहवागचं ट्विट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येतच पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने म्हटलं आहे. या निकालानंतर भारताचा माजी सलामीवर वीरेंद्र सेहवागनं ट्विट केले. 


सेहवागनं ट्विट केलं की...

बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हतीः सुप्रीम कोर्ट
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात निकालाचं वाचन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून झाले. शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बाबरी मशिदीवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हती, असं न्यायालयानं म्हटलं आहे. खोदकामानंतर पुरातत्व विभागानं केलेल्या दाव्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय याकडे पुरावे म्हणून पाहतं. खोदकामानंतर सापडलेल्या कलाकृती या इस्लामिक नव्हत्या, असंदेखील सर्वोच्च न्यायालयानं निकालाच्या वाचनादरम्यान स्पष्ट केलं आहे. 

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानं शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला. शिया आणि सुन्नी या दोन समुदायांमध्ये वाद आहे. वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्डची नसून आमची आहे, असा शिया बोर्डचा दावा होता. तो आधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळे शिया बोर्डनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानंदेखील त्यांचा दावा फेटाळला. याशिवाय निर्मोही आखाड्याचा दावादेखील न्यायालयानं फेटाळून लावला आहे. 

अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. खास या निकालासाठी न्यायालयानं आजचा दिवस निश्चित केला आहे. या प्रकरणी न्या. रंजन गोगोई यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर सविस्तर चर्चा केली होती. याशिवाय देशभरातील सुरक्षा यंत्रणादेखील सतर्क आहेत. 
 

Web Title: Ayodhya Verdict :'Shri Ram Jai Ram Jai Jai Ram', Virender Sehwag takes to Twitter after Ayodhya verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.