Join us  

Ayush Badoni IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या अपमानाचा आयुष बदोनीने घेतला बदला; ३ चेंडूंत १० धावा करून जिंकवला सामना, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील रोमहर्षकता आता वाढत चालली आहे. KKRच्या पॅट कमिन्सच्या अविस्मरणीय खेळीनंतर गुरुवारी लखनौ सुपर जायंट्सने थरारक विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 3:28 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील रोमहर्षकता आता वाढत चालली आहे. KKRच्या पॅट कमिन्सच्या अविस्मरणीय खेळीनंतर गुरुवारी लखनौ सुपर जायंट्सने थरारक विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत LSG ने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. युवा फलंदाज आयुष बदोनीने ( Ayush Badoni) ३ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह १० धावा करून सामना फिनिश केला.

अखेरच्या षटकातील थरार अन् बदोनीचे सेलिब्रेशन...

शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट गेली. त्यानंतर आयुष बदोनीने पहिला चेंडू निर्धाव खेळला. पण, फुल्लटॉस आलेला तिसरा चेंडू बदोनीने सुरेख गॅप काढून चौकार खेचला आणि तेव्हाच त्याने विजयाचा जल्लोष केला. त्यानंतर खणखणीत षटकार खेचून त्याने  लखनौचा विजय व दिल्लीचा पराभव निश्चित केला. त्यानंतर त्याने दिल्लीच्या जखमेवर मीठ चोळणारं सेलिब्रेशन केलं. त्याने या आनंदातून दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या वागणुकीला सडेतोड उत्तर दिले.. दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉ ( ६१), रिषभ पंत ( ३९*) व सर्फराज खान ( ३६*) यांच्या खेळीच्या जोरावर ३ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, पृथ्वीने ज्या प्रकारे दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली होती, त्यात सातत्य राखण्यात अन्य फलंदाज अपयशी ठरले. डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल यांच्या पटापट विकेट पडल्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी कमबॅक केले व दिल्लीच्या धावगतीला वेसण घातले.  रवी बिश्नोईने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तार लखनौला क्विंटन डी कॉक व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. क्विंटनने चांगली खेळी केली, परंतु ८० धावांवर तो बाद झाला. दीपक हुडा ( ११), कृणाल पांड्या ( १९*) व बदोनी ( १०*) यांनी लखनौचा विजय पक्का केला.

आयुष बदोनीचा दिल्ली कॅपिटल्सवर राग का?

  • जानेवारी २०२१मध्ये त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि दिल्लीसाठी तो केवळ ५ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. आयुष बदोनीला आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये लखनौने २० लाखांत ताफ्यात घेतले. २०१८मध्ये त्याने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध २८ चेंडूंत ५२ धावांची खेळी केली होती. तेव्हा तो प्रथम चर्चेत आला. 
  • दिल्ली कॅपिटल्सने घेतलेल्या तीन स्तरीय परिक्षेत आयुष बदोनी पास झाला होता. त्याने या तिनही वेळेस २० पेक्षा कमी चेंडूंत ५०+ धावा करून दाखवल्या. पण, सातत्य दाखवूनही दिल्लीने ऑक्शनमध्ये बदोनीला ताफ्यात घेतले नाही. त्या अपमानाचा वचपा काल आयुषने काढला आणि म्हणूनच दिल्लीच्या पराभवानंतर खास सेलिब्रेशनही केले. 

टॅग्स :आयपीएल २०२२लखनौ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App