कराची : पाकिस्तानचा माजी कसोटीपटू अझहर अली याने कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी स्वत:च्या बॅटसह अन्य वस्तूंचा लिलाव केला. ही बॅट पुण्याच्या ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम’ या संग्रहालयाने खरेदी केली. सर्व वस्तूंच्या लिलावातून २२ लाख रुपये उभारले आहेत. २०१६ ला वेस्ट इंडिजविरुद्ध यूएई येथे कसोटीत अझहरने याच बॅटने ३०२ धावांची खेळी केली होती. दिवस-रात्र कसोटीत त्रिशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला.
याशिवाय २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध घातलेले टी शर्टदेखील त्याने लिलावात ठेवले होते. बॅट आणि टी शर्टवर पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या स्वाक्षरी आहेत.
बॅट आणि टी शर्टसाठी अझहरने प्रत्येकी दहा लाखाचे मूल्य ठेवले होते. त्यापोटी २२ लाख उभारण्यात आले. पुण्यातील संस्थेने सर्वाधिक बोली लावून बॅट खरेदी केली. टी शर्टची खरेदी कॅिलफोर्नियात राहणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकाने ११ लाखांत केली. न्यूजर्सी येथे राहणाºया अन्य एका पाकिस्तानी नागरिकाने एक लाख रुपये दान दिले. पाकमधील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी हा निधी दान करणार असल्याचे अझहर अलीने टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.