Join us  

पोर्तुगालच्या फलंदाजानं रचला इतिहास; ट्वेंटी-२० झळकावलं दमदार शतक, कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा!

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाच्या हालचाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) सुरू केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 5:16 PM

Open in App

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाच्या हालचाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) सुरू केल्या आहेत. २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट खेळवण्याची तयारी आयसीसीनं सुरू केली असून १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात पुन्हा चौकार-षटकार लागलेले पाहायला मिळतील. १९००च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि त्यात ग्रेट ब्रिटन व फ्रान्स अशा दोनच संघांनी सहभाग घेतला होता. आता क्रिकेट ऑलिम्पिकचे स्वप्न पाहत असल्यामुळे जगभारत हा खेळ पसरण्यास आणखी मदत मिळणार आहे. नेदरलँड्स, नामिबिया आदी देशांसह आता ब्राझिल, पोर्तुगाल हे फुटबॉल प्रेमी देशही क्रिकेटकडे वळत आहे. 

शनिवारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत पोर्तुगालच्या अझर अंदानी यानं विक्रमी शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो पोर्तुगालचा पहिला फलंदाज ठरला. त्याच्या शतकाच्या जोरावर पोर्तुगालनं २० षटकांत ८ बाद २१७ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात जिब्राल्टर संघाला ८ बाद १२१ धावाच करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना अंदानीनं ५१ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून १०० धावा केल्या. अँथोनी चॅम्बर्सनं ४४ धावा करून त्याला चांगली साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. आमीर झैब ( २१), नज्जम शाहजाद ( १९) आणि अमनदीप सिंह ( १४) यांनी छोटेखानी खेळी केली.

 

टॅग्स :पोर्तुगालआयसीसी
Open in App