Join us  

'बाप बाप होता है' यावरून शोएब अख्तर भडकला; म्हणाला, "...तर मग 'तो' वाचला नसता"

'बाप बाप होता है' यावरून शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागवर जोरदार निशाणा साधला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:36 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये सामना पार पाडला. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांतील माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. मात्र या बहुचर्चित सामन्याच्या आधी एका भारतीय पत्रकारासोबत शोमध्ये चर्चेदरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) चांगलाच संतापला. याच सामन्यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) केलेल्या 'बाप बाप होता है' या कमेंटवर अख्तरला प्रश्न विचारला असता तो संतापल्याचे पाहायला मिळाले. 

वीरेंद्र सेहवागने अनेकवेळा मुलाखतींमध्ये याचा खुलासा केला आहे की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील एका सामन्यात सचिन तेंडुलकरने अख्तरला षटकार मारल्यानंतर त्याने (वीरेंद्र सेहवाग) 'बाप बाप होता है, ओर बेटा बेटा होता है' असे विधान केले होते. भारतीय पत्रकाराने पाकिस्तानी दिग्गजाला याचीच आठवन करून दिली, मात्र अख्तरने म्हटले, तसे अजिबात नाही तसे जर असते तर 'तो' म्हणजेच वीरेंद्र सेहवाग वाचला नसता. 

 शोएब अख्तर संतापलाअख्तर याला पत्रकाराने प्रश्न केला की, सगळ्यांना माहिती आहे की सेहवागने अशी टिप्पणी केली असल्याचे म्हटले होते. मात्र तुम्हाला याशिवाय आणखी काही प्रसंग आठवत असेल तर सांगा. यावर शोएब अख्तर म्हणाला, "सर्वप्रथम जर त्याने माझ्या तोंडावर ही गोष्ट बोलली असती, तर तो वाचला नसता. तो कधी आणि कोणत्या वेळी बोलला हे मला खरोखर माहीत नाही. मी स्वतः त्याला एकदा विचारले होते. पण असे काही होते की नाही याबाबत तो स्पष्ट बोलला नाही", अशा शब्दांत अख्तरने सर्व आरोप फेटाळले. 

...तर दोन देशातील अंतर वाढेल "त्याने स्पष्टपणे सांगितले नाही, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असले प्रोग्राम जरूर करा. तुम्ही काहीही बोला, हा खूप आनंदाचा प्रसंग आहे. मात्र सर्वांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे मी देखील त्याचा आदर करतो आणि मी वीरूचा मोठा चाहता देखील आहे. भारत आणि माझ्याबद्दल असे काही बोलू नका की दोन देशांमधील अंतर वाढेल. मला हे अंतर कमी करायचे असून मला हे अजिबात आवडले नाही", असे म्हणत अख्तरने सेहवागच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली. 

 

टॅग्स :शोएब अख्तरएशिया कप 2022विरेंद्र सेहवागपाकिस्तानसचिन तेंडुलकर
Open in App