Join us  

Babar Azam Pakistan Captain: बाबर आझम पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार! क्रिकेट बोर्डाने केली अधिकृत घोषणा

Babar Azam appointed as Pakistan captain: शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 10:58 AM

Open in App

Babar Azam appointed as white-ball captain: पाकिस्तान क्रिकेट संघाने अखेर बहुचर्चित प्रश्नांना पूर्णविराम लावत बाबर आझमची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. निर्धारित षटकांचे क्रिकेट म्हणजे टी२० आणि वनडे संघासाठी बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असेल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटरद्वारे स्पष्ट केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची निवड समिती आणि PCB चेअरमन मोहसीन नक्वी यांनी एकमताने बाबर आझमची पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड केल्याचे ट्विटमधून सांगण्यात आले. आगामी T20 World Cup 2024 च्या हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानच्या टी२० संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी होता. पण, त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे समजताच त्याने पद सोडले. त्यानंतर बाबरला पुन्हा नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे. 'टाइम्स नाउ'ने दिलेल्या माहितीनुसार, शाहीन आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर नाराज होता. नक्वी आणि निवडकर्त्यांनी आफ्रिदीशी चर्चा न करता त्याला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले गेले. शाहीनच्या नेतृत्वात पाकिस्तानने केवळ एक टी२० मालिका खेळली. त्यातही त्यांचा ४-१ असा पराभव झाला. त्यामुळे त्याला पदावरून हटवण्यात आले असल्याची चर्चा आहे.

शाहीन आफ्रिदी कर्णधारपद सोडण्यास तयार होताच. पण बोर्डाकडून याबद्दल कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे त्याने सांगितले होते. माजी कर्णधार बाबर आझमवर आता पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपवली आहे. या यादीत बाबर सोबतच मोहम्मद रिझवानने नाव शर्यतीत होते. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर बाबरला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले गेले होते. त्यानंतर कसोटी संघाची धुरा शान मसूद तर टी२० संघाचे कर्णधारपद शाहीन आफ्रिदीकडे देण्यात आले होते.

टॅग्स :बाबर आजमऑफ द फिल्डपाकिस्तानटी-20 क्रिकेट